JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चित्रपट आणि मालिकांच्या शुटिंगबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

चित्रपट आणि मालिकांच्या शुटिंगबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टी ठप्प झाली असून चित्रीकरणास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 31 मे : गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच ब्रॉडकाकास्टिंग फौंडेशनचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टी ठप्प झाली असून चित्रीकरणास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. आज यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला असून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास काही अटी व शर्तींचा अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे. सरकारच्या नव्या नियमांनुसार आता निर्मात्यांना निर्मिती पूर्वीची आणि निर्मितीनंतरची कामे शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करता येईल. निर्मात्यांनी याप्रमाणे काळजी घेऊन चित्रीकरण करावयाचे असून नियमांचा भंग झाल्यास कामे बंद करण्यात येतील असेही यात म्हटले आहे. कोव्हिड संदर्भात लागू केलेल्या प्रतिबंधातील सुचना यासाठी लागू राहतील. या चित्रीकरण कामांसाठी निर्मात्यांना मुंबईकरीता व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळ , दादासाहेब फाळके चित्रनगरी , गोरेगाव येथे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी त्या त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल. दरम्यान, केंद्र सरकारने शनिवारी लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची घोषणा केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून राज्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी ही नियमावली जाहीर केली आहे. केंद्राने जारी केलेल्या नियमांप्रमाणेच राज्य सरकारकडूनही कंटेन्मेंट झोनमध्ये शिथिलता आणलेली नाही. मात्र इतर भागात सूट देण्यात आली असून त्यासाठी काही नियम आणि अटी ठेवलेल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या