JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शेतकऱ्याची लेक इतकी देखणी की सगळे घालतायत मागणी, मिळवून दिलं 2 लाखांचं बक्षीस

शेतकऱ्याची लेक इतकी देखणी की सगळे घालतायत मागणी, मिळवून दिलं 2 लाखांचं बक्षीस

शेतकऱ्याची लेक एवढी गुणवान की अवघ्या महाराष्ट्रातून येतेय मागणी

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नरेंद्र मते (प्रतिनिधी) वर्धा, 22 जानेवारी: आपल्या गायीसाठी लाखाची मागणी येऊनही मालकानं ही ऑफर धुडकावून लावल्याचं वर्धात पाहायला मिळालं. पैशांच्या हव्यासापोटी अथवा गरजेपोटी गाय विकली जाते असे प्रकार आपण अनेकदा ऐकले मात्र लाखो रुपयांची बोली लागूनही मालकानं आपली गाय विकण्यास नकार दिला आहे. शेतीतातील कामं असो की दूध. दोन्ही कामाची ही गाय आहे. त्यात विदर्भाचे भूषण मानली जाणारी गवळाऊ गायींना विशेष महत्त्व आहे. वर्धा जिल्ह्यातील गोपालकाकडे अशीच लाखमोलाची गवळाऊ गाय आहे. दोन लाख रुपयांना मागणी करूनही गोपलकानं ही गाय विकण्यास नकार दिला. दिसायला पांढरी शुभ्र आणि उंच माथा, बदामी आकाराचे डोळे, शरीरानं काटक अशी ही गवळाऊ प्रजातीची गाय आहे. वर्धा जिल्ह्याच्या खरांगणा इथल्या भोजराज अरबट यांच्या मालकीची ही गाय. मोरांगणा इथं आयोजित केलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या प्रदर्शनात अरबट यांच्या 5 वर्षांची ही गाय सगळ्यांचंचं लक्ष वेधून घेत होती. इतकंच काय, गवळाऊ जनावरांच्या प्रदर्शनात गाय गटात या गायीनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. या आकर्षक गायीला दोन लाखांचा खरेदीदारही आला होता. पण अरबट यांनी स्पष्ट नकार दिला. गायीला आम्ही ठेवणार आहोत. आम्हाला तिचं वासरू हवं आहे. तिला देणार नाही अशी प्रतिक्रिया अरबट यांनी दिली आहे. सध्या तिच्या दुधाला 60 रुपयाचा भाव गावात मिळत असल्याचंही ते म्हणाले. पशुप्रदर्शनात वळू गटात चॅम्पियन ऑफ शोचा पुरस्कार अभिषेक मुरके यांच्या वळूला तर गवळाऊ गाय गटात चॅम्पियन ऑफ शोचा पुरस्कार भोजराज अरबट यांच्या गवळाऊ गायीला मिळाला आहे. हिंदू संस्कृतीत गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकर्‍यांचं पालनपोषण करणारी आणि त्यांचं उपजिवेकेचं साधन असणाऱ्या गायीला शेतकरी कुटुंबातही तितकंच महत्त्व आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या