JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक! ठाण्यात गोवरचा कहर, चार रुग्णांचा मृत्यू

धक्कादायक! ठाण्यात गोवरचा कहर, चार रुग्णांचा मृत्यू

मुंबई आणि आसपासच्या परिसरात गोवरच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये गोवरचे एकूण 4 बळी गेले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 24 नोव्हेंबर : मुंबई आणि आसपासच्या परिसरात गोवरच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये गोवरचे एकूण 4 बळी गेले आहेत. सलग तीन दिवसांमध्ये ठाण्यात तिघांना गोवरमुळे जीव गमवावा लागला आहे, हे तिन्ही मृत्यू भिवंडी शहरातले आहेत. आज 8 महिन्यांच्या बाळाचा गोवरमुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर ठाण्यात गोवरचा पहिला बळी गेला आहे. 22 नोव्हेंबरला ठाण्यात एका साडेसहा वर्षांच्या मुलीचा गोवरमुळे मृत्यू झाला. या मुलीने गोवरची लस घेतली नव्हती. पत्राचाळ शीळ येथे राहणारी ही मुलगी होती. या महिन्यात ठाणे मनपा हद्दीत एकूण 17 गोवर पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ठाणे जिल्ह्यातील गोवरची वाढती संख्या लक्षात घेता मुलांना लवकरात लवकर गोवरची लस घ्यावी, असं आवाहन ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. गोवरची लस न घेतलेल्यांना गोवरची लागण होण्याचं प्रमाण जास्त आहे. मुंबईतही गोवरचा उद्रेक दुसरीकडे मुंबईतही गोवरचा उद्रेक झाला आहे. बीएमसीच्या माहितीनुसार, शहरात एकूण 3208 लक्षणे असलेले रुग्ण समोर आले आहेत, त्यापैकी एकूण 220 रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. मुंबईत बुधवारी गोवरच्या प्रादुर्भावामुळे 8 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला असून, या आजाराने शहरातील मृतांची संख्या 12 झाली आहे. सोमवारी मुंबईत सर्वाधिक 24 रुग्ण आढळले. त्याचबरोबर गोवंडी आणि कुर्ला येथेही सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. बहुतांश आजारी मुले 5 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. केवळ मुंबईतच नाही तर बाहेरही गोवरचा प्रादुर्भाव वाढत आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात या आजाराच्या 500 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या