JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठाण्यात पावसाचं धुमशान, अनेक ठिकाणी जुनी झाडं कोसळली

ठाण्यात पावसाचं धुमशान, अनेक ठिकाणी जुनी झाडं कोसळली

Thane Heavy Rain: ठाण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. जाणून घ्या ठाण्यातल्या पावसाचे लेटेस्ट अपडेट्स.

जाहिरात

आज कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 12 जून: ठाण्यात (Thane) मुसळधार पाऊस सुरु आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं ( waterlogging) आहे. सलग तीन दिवसापासून पावसानं ठाण्याला झोडपून काढलं आहे. काल रात्रीपासून पावसाने अधिकच जोर धरला असून अजूनही मुसळधार पाऊस सुरु आहे. ठाण्यात (Thane City Rain Updates) पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. या जोरदार पावसामुळे ठाण्यात शेकडो वर्ष जुने झाडे पडल्याची घटना घडल्या आहे. ठाणे महापौर बंगल्यातील शेकडो वर्ष जुनं झाड पडलं.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, कोकण परिसरात पावसाचा जोर कायम पाहायला मिळत आहे. येत्या काही तासात मुंबईसह ठाण्यात पाऊस जोर वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईतही पावसाचा जोर वाढला मुंबईत पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दृष्यमानता कमी झाल्याने समोरचं दिसण्यास अडथळा येत आहे. भरतीलाही सुरुवात झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. वसई-विरार मध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली असून नालासोपारा विरार वसई या ठिकाणच्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. नवी मुंबईत मुसळधार पावसानं हजेरी लावली. सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता. सकाळी 9 वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अजून पावसाचा वेग कायम आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या