ठाणे, 06 जून: मुंब्रा (Mumbra) येथे एका मुलाला अमानुष मारहाण (Brutally Beaten) करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातली घटना आज व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे उघडकीस आली आहे. चोर समजून एका 17 वर्षांच्या मुलाला गाडीला बांधून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. काय आहे नेमकी घटना मुंब्रा येथे एका ठिकाणी इमारत बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी छोट्या मोठ्या चोरीच्या घटना घडत असतात. अशातच एका घटनेत मुंब्रातील एका 17 वर्षीय मुलीवर चोरीचा आळ घेण्यात आला. चोरी केल्याच्या संशयावरुन या मुलावर अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत तो मुलगा अर्धमेला झाला आहे. ही घटना 31 मे रोजी घडली आहे. मात्र मुलाला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानं ही घटना उघडकीस आली आहे. काय आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओत ज्या ठिकाणी इमारतीचं बांधकाम सुरु आहे त्या ठिकाणी असलेल्या सिमेंट मिक्सर गाडीला या मुलाला बांधण्यात आलं होतं. त्याचे हात मिक्सरच्या हॅंडलमध्ये अडकवून त्याला जोरात बांधलं होतं. मारहाण करताना या मुलाला त्याच्यासोबत अजून कोण आहे? हा प्रश्न सतत विचारला जात होता. एवढंच काय तर माझे हात खुप दुखताहेत हात सोडा मी मोबाईल नंबर देतो असं वारंवार हा मुलगा सांगताना व्हिडिओत दिसतंय. मात्र तरीही मुलाला काही सोडण्यात आलं नाही. उलट त्याच्यावर आणखी अत्याचार केले जातच होते. आश्चर्य म्हणजे 20-25 जणांसमोर हा प्रकार सुरु असताना देखील कोणीच त्या मुलाला वाचवण्याकरता पुढे आलं नाही. मात्र तिथे उपस्थित असलेल्या एकानं ही घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली त्यामुळे नेमकं काय घडलं ते उघड झाले. डोळे-पाय जास्त फडफडणे कँन्सरचं लक्षण असू शकतं; असं होत असेल तर काळजी घ्या या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस तात्काळ सतर्क झाले आणि त्यांनी त्या मुलाला तात्काळ उपचाराकरता सरकारी रुग्णालयात दाखल केलं आहे. दरम्यान क्रूर निर्दयी प्रकार करणाऱ्या दोघा आरोपींना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. तर काही जण फरार आहेत. मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. 31 मे या तारखेला घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर याद राख? अशी धमकी देत, पाहिजे तेवढे पैसे घे पण मुलाचे तोंड बंद ठेव अशा धमक्या देखील मुलाच्या आईला देण्यात आल्या होत्या. उपचाराकरता 10 हजार रुपये देखील देण्यात आले होते. पण मुंब्रा पोलिसांनी वेळीच सावधानता दाखवल्यानं मुलाच्या आईला आणि मुलाला संरक्षण मिळालं आहे, ज्यामुळे पोलिसात तक्रार दाखल झाली. तर पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.