JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...तर वेगळ्या अँगलने तपास करणार, सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर थेट गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

...तर वेगळ्या अँगलने तपास करणार, सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर थेट गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात

या सर्व गोष्टींवरून स्पष्ट होतं की, सुशांतला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या नव्हती. पण तो डिप्रेशनमध्ये होता आणि हेच त्याच्या आत्महत्येचं कारण ठरलं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 15 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने नेमका कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अशातच सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीनं पोलीस चौकशीमध्ये मोठा खुलासा केला. तिच्या म्हणण्याप्रमाणे सुशांतला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या नव्हती. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणात (sushant singh rajput suicide case) गूढ वाढलेलं असतानाच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘अभिनेता सुशांत राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात पीएम रिपोर्टनंतर सर्व बाबी पुढे येतील. सध्या काही संशयास्पद वाटत नाही, पण संशयास्पद असेल तर पोलीस वेगळ्या ॲंगलनेसुद्धा तपास करतील,’ अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या आत्महत्या प्रकरणात उलट-सुलट चर्चा सुरू असताना गृहमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. प्रेम प्रकरण ठरलं कारण? सुशांतच्या आत्महत्येमागचं कारण फक्त डिप्रेशन नाही तर प्रेम प्रकरण असल्याचं बोललं जात आहे. सुशांत गेले काही महिने डिप्रेशनवरील औषधं घेत नव्हता. आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजे शनिवारी रात्री सुशांतने दोन जणांना फोन केला होता. यात त्याची गर्लफ्रेण्ड मानली जाणारी रिया चक्रवर्ती आणि पवित्रा रिश्तामधील अभिनेता महेश शेट्टी यांचा समावेश आहे. मात्र या दोघांनीही फोन उचलला नाही. त्यानंतर रविवारी दुपारी 12 वाजता महेश शेट्टीनं सुशांतला पुन्हा फोन लावला, मात्र तोपर्यंत सुशांतचा मृत्यू झाला होता. कुणाची होणार चौकशी? पोलिसांना सुशांतच्या घरून सुसाइड नोट सापडली नसली तरी काही मेडिकल कागदपत्र सापडले आहेत. ज्या डॉक्टरांकडे त्याचे उपचार सुरू होते, त्यांचीही चौकशी केली जाईल. याशिवाय सुशांतची एक्स गर्लफ्रेंण्ड अंकिता लोखंडेचा जबाबही नोंदवला जाऊ शकतो. सुशांतच्या मोबाईलची तपासणी सुरू आहे, यात गेल्या 24 तासांत ज्यांच्याशी त्याचा संपर्क झाला, त्या सर्वांची चौकशी पोलीस करणार आहेत. संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या