Indore ST bus Accident: इंदौरहून अमळनेरच्या दिशेनं जाणारी एसटी महामंडळाची बस पुलाचे कठडे तोडून नर्मदा नदीत कोसळली. या भीषण अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची आत्ताची माहिती आहे.
आज सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. वेगवान कारला ओव्हरटेक करत असताना कदाचित नियंत्रण सुटून बस कठड्याला धडकली, असं धर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बाळासाहेब खिस्ते यांनी सांगितलं.
इंदौर-अमळनेर बस क्रमांक MH 40 N 9848 अमळनेरला येत होती. मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली.
या बसमध्ये 50 ते 60 प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत 15 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर 12 ते 15 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.