शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बंडखोर मंत्र्यांविरुद्ध (Ministesters in Maharashtra) आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांच्याकडील त्यांच्याकडील खाती काढून घेतली आहेत.
संदिपान आसाराम भुमरे (Sandipan Bhumare) यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खातेसुद्धा शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे देण्यात आलं आहे.
शिवसेनेतून नुकतेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झालेल्या उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे देण्यात आले आहे.
शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती- संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (रा.उ.शु.),
राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)
अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती- प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)
ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती(कंसात) आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)