मुंबई, 17 डिसेंबर : थंडीचा सर्वात जोर असलेला डिसेंबर महिना अर्धा संपलाय. पण, मुंबईमध्ये ऑक्टोबर हिट प्रमाणे डिसेंबर हिट सुरू आहे. डिसेंबरच्या मध्यात मुंबईत तापमानाचा पारा वाढला आहे. देशातील सर्वात जास्त तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे. त्याचबरोबर राज्याच्या अन्य भागातही तापमानामध्ये वाढ झालीय. मुंबईत शुक्रवारी (16 डिसेंबर) देशातील सर्वाधिक 35.6 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. मुंबईतील बहुतेक भागामध्ये 32 ते 34 अंश सेल्सियस तापमान असेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला होता, पण प्रत्यक्षात त्यापेक्षाही सुमारे दीड अंश जास्त तापमानाची नोंद झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्र पुणे शहराचे दिवसाचे कमाल तापमान 32 अंश राहील, तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. गुरूवारी पुण्यात 17.1 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. कोल्हापूरमध्ये शुक्रवारी कमाल तापमान 32.5 तर किमान तापमान 20 अंश इतके होते. सांगलीमध्ये कमाल 33 तर किमान 19 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर सोलापूरमध्ये कमाल तापमना 34.4 तर किमान तापमान 20.4 इतके होते. उत्तर आणि मध्य महाराष्ट्र नाशिकमध्ये कमाल तापमान 31.5 तर किमान 18.4 अंश तापमानाची नोंद झालीय. तर अहमदनगरमध्ये दिवसभरात कमाल तापमान 29 अंश तर किमान 21 अंश सेल्सियस असेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. मुंबईत श्वास गुदमरतोय, ऐन थंडीत देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद, राज्यात अशी असेल स्थिती विदर्भ नागपूरमधील कमाल तापमानात 3. 1 अंश सेल्सियसची वाढ होऊन ते 32 अशं सेल्सियस इतके होते. तर शहरातील किमान तापमान हे 17.8 अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले आहे. वर्ध्यात कमाल 33 तर किमान 19.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर अमरावतीमध्ये कमाल 32.8 तर किमान 19.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांनो, सरकारी वखारात करा धान्यसाठा, कर्जासह मिळेल मलाचेही संरक्षण! मराठवाडा मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कमाल तापमान 31.6 तर किमान 16.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर बीड शहरात कमाल तापमान 31 तर किमान 20.5 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले.