JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आंदोलन चिघळलं! 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी फोडला दुधाचा टँकर, पाहा VIDEO

आंदोलन चिघळलं! 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी फोडला दुधाचा टँकर, पाहा VIDEO

पश्चिम महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाची धग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जुलै : दूध दरवाढीच्या मागणीवरून राज्यभरात विविध संघटना आक्रमक झाल्या असून रस्त्यावरून उतरून आंदोलन केलं जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या नांदणी गावातल्या सागर शंभूशेट्टी यांनी आणि त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला तसंच ग्रामदैवत काळभैरवाला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन केलं. दुसरीकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात येत असलेलं दूध आंदोलन चिघळलं आहे. पहाटे पुणे बेंगळुरू हायवेवर दुधाचा टँकर फोडल्यानंतर पुन्हा कसबे डिग्रजहून मुंबईकडे चाललेला राजारामबापू दूध संघाचा एक टँकर स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी फोडला आहे. दुधाला योग्य असा भाव मिळावा यासाठी हे आंदोलन आजपासून सुरू झाले आहे. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाची धग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

राज्यभरात आंदोलन, बीडमध्ये शिवसंग्राम आक्रमक शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान द्या या मागणीसाठी बीड जिल्हा शिवसंग्रामच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दुधाच्या पिशव्या भेट देत अनोखे आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असून शेतकरी विरोधी धोरण राबवत आहे, असा आरोप करत घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही, कर्ज माफीचा गोंधळ, पीक विम्यातून तूर आणि कापूस वगळले, अशा विविध मुद्द्यावरून निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसंग्रामचे जिल्हा अध्यक्ष सुधीर काकडे यांनी दिला. पंढरपूरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक घालून स्वाभिमानीचा दूध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. ग्रामदैवत तुंगेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक घालून दूध दरवाढीच्या आंदोलनाला पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरुवात केली. गायीच्या दुधाला 25 रू प्रतिलिटर दर व 5 रु प्रतिलिटीर अनुदान देण्याची सद्बुध्दी राज्य सरकारला यावी, असं म्हणत पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे व कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे, उस्मानाबाद स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तुळजापूरच्या तुळजाभवानीमंदिरा समोर दूधदरवाढीची मागणी करण्यात आली.तुळजाभवानी मंदिर बंद असल्याने मंदिरासमोरच देवीचा अभिषेक करून पूजा करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या