JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वादग्रस्त विधान प्रकरणात अटी आणि शर्तींविना भिडे गुरुजींना जामीन मंजूर

वादग्रस्त विधान प्रकरणात अटी आणि शर्तींविना भिडे गुरुजींना जामीन मंजूर

वादगस्त विधान प्रकरणी संभाजी भिडे आज नाशिक कोर्टात हजर झाले होते. कोणत्याही अटी आणि शर्तींविना भिडे गुरुजींचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रशांत बाग, प्रतिनिधी नाशिक, 07 डिसेंबर : वादगस्त विधान प्रकरणी संभाजी भिडे आज नाशिक कोर्टात हजर झाले होते. कोणत्याही अटी आणि शर्तींविना भिडे गुरुजींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. फक्त 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर या प्रकरणातली पुढील सुनावणी 14 तारखेला होणार आहे. सुनावणीस कायम गैरहजर राहण्याच्या भिडे गुरुजी यांच्या अर्जावर अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं भिडेंचे वकील ऍड. अविनाश भिडे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, पुढच्या सुनावणीला ते कोर्टात हजर राहणार असल्याची माहितीही त्यांच्या वकिलाकडून देण्य़ात आली आहे. गेल्या अनेक तारखांना भिडे गुरुजी कोर्टात हजर राहिले नाहीत. त्यासाठी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढणार असल्याचं कोर्टाने म्हटलं होतं. यानंतर आज भिडे गुरुजींनी कोर्टात हजेरी लावली. भिडे कोर्टात आल्य़ानंतर शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेर मोठी गर्दी केली होती. सुरक्षेच्या दृष्टीने कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. भिडे यांची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर कोर्टानं भिडे यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण माझं वय 83 आहे. त्यामुळे मला सुनावणीस गैरहजर राहण्याची परवानगी द्या असा अर्ज भिडेंच्या वतीने कोर्टात सादर करण्यात आला होता. आंबा पुराण तो विशिष्ट आंबा खाल्ल्याने माणसाची सेक्स पॉवर वाढते. या आंब्यावर ऑस्ट्रेलियात संशोधन झालं आहे. त्यात या आंब्यात ही शक्ती असल्याचं सिद्ध झालं आहे. भारतातही अनेकांनी सशोधन केलं असून त्यातही ती गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यामुळे हे योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. मनुस्मृती मी ज्ञानोबा आणि तुकोबांची मनूबरोबर तुलना केली नाही. माझं भाषण नीट समजून घ्या. राजस्थान हायकोर्टासमोर मनूचा पुतळा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे. ते ताज्य आहे तेवढंच घ्यायचं आणि बाकी सगळं टाकून द्यायचं असं सगळं सुरू आहे. राज्य घटनेवर माझा पूर्ण विश्वास आहे. वारी करणारी 13वी पिढी वारीची माझ्या घराण्यातली 13वी पिढी आहे. मला वारीत अशांतता निर्माण करायची नव्हती आणि नाही. आमचा वारकरी तसा नाही. केवळ काही लोक अपप्रचार करत आहेत. राजाभाऊ चोपदारांनीही माझी भूमिका समजून घेतली आहे. VIDEO: भाजपला धक्का; प्रशांत हिरे आणि अपूर्व हिरेंची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या