JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रॉबर्ट वाड्रांकडून राहुल गांधींची साईबाबांशी तुलना, भारत जोडो यात्रेला म्हणाले..

रॉबर्ट वाड्रांकडून राहुल गांधींची साईबाबांशी तुलना, भारत जोडो यात्रेला म्हणाले..

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा रविवारी शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला आले होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिर्डी, 30 ऑक्टोबर : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा रविवारी शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला आले होते. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतून देशात बदल दिसेल, कारण हजारो लोक या यात्रेत जोडले जात आहेत, राहुल गांधींकडे लोक भविष्य म्हणून बघत आहेत, असं रॉबर्ट वाड्रा म्हणाले. राहुल गांधींचे विचार साईबाबांसारखेच एकत्मतेचा प्रचार करणारे आहेत, अशी प्रतिक्रिया रॉबर्ट वाड्रा यांनी दिली. ‘राहुल गांधी अनेक ठिकाणी जात आहेत आणि हजारो लोकांची भेट घेत आहेत. लोक मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत येत आहेत. भविष्यात बदल दिसेल, कारण राहुल गांधी लोकांसाठी नवीन आशा बनून समोर आले आहेत. भाजप आमच्यावर विनोद करतील, पण राहुल गांधी आणि प्रियंका गांधी थांबणार नाहीत. आम्ही लोकांच्यामध्ये आहोत आणि त्यांच्यासाठी एकत्र येऊन काम करणार आहोत,’ असं वक्तव्य रॉबर्ट वाड्रा यांनी केलं. गांधी कुटुंबाला लोकांचं प्रेम मिळत आहे. नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे जनतेची मदत करण्याचा प्रयत्न करतील. ज्यांना पक्ष सोडायचा आहे, ते सोडू शकतात, पण जे राहतील त्यांना सोनिया गांधींचं बलिदान आणि राहुल, प्रियांका यांचा प्रयत्न समजेल, असं रॉबर्ट वाड्रा म्हणाले. साईबाबांनी एकतेचा संदेश दिला आहे. सध्या देश संकटाचा सामना करत आहे. राहुल गांधींचे विचार साईबाबांच्या विचारांसारखे आहेत. राहुल गांधींना साईबाबांचे आशिर्वाद मिळतील, अशी अपेक्षा रॉबर्ट वाड्रा यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या