JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune Crime News: पुण्यात ट्रॅव्हल्स चालकानं गाठला कळस; पळवून नेत महिलेवर बसमध्येच बलात्कार

Pune Crime News: पुण्यात ट्रॅव्हल्स चालकानं गाठला कळस; पळवून नेत महिलेवर बसमध्येच बलात्कार

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. ट्रॅव्हल चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 13 जून: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. ट्रॅव्हल्स चालकानं स्वारगेट परिसरात (Swargate area) महिलेचं अपहरण केलं आहे. एवढंच नाही तर अपहरण (kidnapping) करून आरोपीनं महिलेवर बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. ट्रॅव्हल चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. खोलीच्या शोधात असताना ट्रॅव्हल्समध्ये झोपण्यास सांगून ट्रॅव्हल्स सुरू करून कात्रज परिसरात (Katraj Area) नेली आणि तेथे बलात्कार (Raped) केला. या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बस चालक नवनाथ शिवाजी भोग (वय 38) आरोपीला अटक करण्यात आली आहे. काय आहे नेमकी घटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला काम शोधण्यासाठी आपल्या पतीसोबत वाशिम वरून प्रवास करत पुण्यात आली होती. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट ST स्टँड परिसरात झोपण्यासाठी जागा शोधत होते. तेवढ्यात ट्रॅव्हल्स बस चालक आरोपी नवनाथ शिवाजी भोग हा रतीकांत बंदीचोडे आणि पीडित महिलेस तुम्ही माझ्या बसमध्ये झोपा, एवढ्या रात्री कुठे जागा मिळणार,असे त्यांनी सांगितलं. त्या आरोपीवर विश्वास ठेवून दोघे जण बसमध्ये आराम करण्यास गेले. तेवढ्यात पीडित महिलेचा पती बाथरूमसाठी गेला असता, आरोपीने काही क्षणात बस तेथून पळवून नेली आणि तू जर आरडा ओरड केल्यास तुला जीवे मारेल अशी धमकी दिली. स्वारगेटजवळ असलेल्या फुटपाथच्या बाजूला बस थांबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा कात्रज बस स्टॉप जवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबून पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर बसमधून पीडित महिलेस खाली उतरवले आणि आरोपी तेथून पसार झाला. पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई,  तब्बल 1105 काडतुसे जप्त   त्यानंतर पीडित महिला तिच्या पतीला स्वारगेट परिसरात भेटली. त्यानंतर दोघांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच ट्रॅव्हल्स चालकविरोधात गुन्हा दाखल केला. त्या आरोपीला बंगलोर हायवेवर जेरबंद करण्यात यश आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या