JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चर्चा तर होणारच! Elon Musk यांचा 'तो' पुणेकर मित्र कोण आहे? ज्याला ट्विटरवर देतात क्वीक रिप्लाय

चर्चा तर होणारच! Elon Musk यांचा 'तो' पुणेकर मित्र कोण आहे? ज्याला ट्विटरवर देतात क्वीक रिप्लाय

सोशय मीडियावर ज्या पुणेकर तरुणाची चर्चा आहे प्रणय पाटोळे (Pranay Patole) असे या तरुणाचे नाव असून तो आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 मार्च : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे (Tesla) सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) ट्विटरवर खूप अॅक्टिव्ह आहेत. ट्विटरवर त्यांचा वावर असा आहे की पुण्यातील एका इंजिनीअरशी त्यांची मैत्री आहे. खरंतर 2018 मध्ये इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या पुण्यातील तरुणाने टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांना टेस्लाच्या ऑटोमॅटिक विंडस्क्रीन वायपर्समधील त्रुटींबद्दल ट्वीट केले होते, ज्याला मस्क यांनी क्वीक रिप्लाय दिला आणि सांगितले की गाड्यांच्या पुढील बॅचमध्ये ही समस्या सोडवली जाईल. सोशय मीडियावर ज्या पुणेकर तरुणाची चर्चा आहे प्रणय पाटोळे (Pranay Patole) असे या तरुणाचे नाव असून तो आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत आहे. प्रणॉयने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याने Reddit वर टेस्लाच्या ऑटोमॅटिक वायपर्सशी संबंधित समस्येबद्दल वाचले होते आणि त्याबद्दल मस्क यांना ट्वीट करण्याचा निर्णय घेतला होता. प्रणय म्हणतो की, त्याला मस्क यांच्याकडून इतक्या झटपट उत्तराची अपेक्षा नव्हती आणि मस्क यांचे उत्तर पाहून तो खूपच आश्चर्यचकित झाला. मस्क यांनी आपल्या ट्वीटला दिलेले उत्तर हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असल्याचेही त्याने म्हटले आहे. मस्कने मंगळावर पाठवलेल्या नासाच्य क्युरिऑसिटी रोव्हरबद्दल प्रणयच्या ट्वीटलाही मस्क यांनी रिप्लाय दिला आहे. या ट्वीटला 25000 हून अधिक रिट्विट्स आणि 1.30 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

संबंधित बातम्या

मस्क मित्राप्रमाणे बोलतात मस्क यांचे त्याच्यासोबतचे व्यवहार अतिशय अनौपचारिक असून ते ट्विटरवर थेट मेसेजद्वारे एकमेकांशी बोलत असल्याचे प्रणय सांगतो. एका मुलाखतीत, जेव्हा प्रणयला विचारण्यात आले की जगातील सर्वात प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्तींपैकी एकाशी बोलण्याचा त्याचा अनुभव कसा होता, तेव्हा तो म्हणाला की मस्क यांनी त्याला कधीही असे वाटू दिले नाही की ते खूप श्रीमंत व्यक्ती आहेत. प्रणयच्या मते, मस्क त्याच्याशी मित्राप्रमाणे वागतात. प्रणय सांगतो की, जेव्हा तो मस्क यांना ट्विटरवर मेसेज करतो तेव्हा त्याला काही मिनिटांतच उत्तर मिळते. इलॉन मस्क यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न आता 2022 मध्ये ट्विटरवर प्रणॉयच्या फॉलोअर्सची यादी खूप मोठी झाली आहे, ज्यामध्ये जगभरातील अनेक प्रसिद्ध लोकांचा समावेश आहे. प्रणयचे मस्क यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न आहे आणि तो पुढील अभ्यासासाठी अमेरिकन विद्यापीठांमध्ये अर्ज करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या