JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी, दोन गंभीर

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी, दोन गंभीर

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील प्रवासी मोठ्याप्रमाणावर जखमी झाल्याची माहिती आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रमोद पाटील, प्रतिनिधी खोपोली, 13 नोव्हेंबर : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील प्रवासी मोठ्याप्रमाणावर जखमी झाल्याची माहिती आहे. ट्रक आणि बसची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. अपघातानंतर तिथले स्थानिक, हायवेवरून जाणारे प्रवासी आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीपासून 40 किमीच्या अंतरावर हा अपघात झाला आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, त्यामुळे हा ट्रक डिव्हायडर तोडून मुंबई लेनमध्ये आला. मध्ये असलेल्या स्क्रॅप विखुरला गेला आणि स्क्रॅपचे तुकडे बसमध्ये मारले गेले. बस पूर्णपणे भरलेली होती, यातल्या 15 प्रवाशांना दुखापत झाली आहे. यापैकी 2 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ट्रक नंबर MH-40- BG- 3457 चा चालक नावेद खान हा पुण्याहून मुंबईकडे जात होता, तेव्हा ट्रकचा ब्रेक फेल झाला. हा ट्रक मुंबई लेनवरून पुणे लेनवर गेला आणि बस नंबर KA-41-D-1471ला जाऊन आपटला, ज्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात नागपूरचा राहणारा ट्रक चालक नावेद खान आणि बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासह अन्य 13 जणांना अॅम्ब्युलन्सने उपचाराकता रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या