JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सातारा : रात्रभर गटारात पडून राहिला; सकाळी रिक्षाचालकाला पाहताच म्हणाला..Shocking Video

सातारा : रात्रभर गटारात पडून राहिला; सकाळी रिक्षाचालकाला पाहताच म्हणाला..Shocking Video

सातारा, 12 जुलै : सातारा शहरातील जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या (Civil Hospital Satara) बाहेर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भल्या मोठ्या गटरातून एका युवकाला रिक्षा चालकांनी जिवंत बाहेर काढले. (Man in Gutter Satara) संदीप सर्जेराव जांभळे असे या युवकाचे नाव आहे. तो काल सायंकाळी पोवईनाका परिसरातील या गटरात पडला होता. काय आहे संपूर्ण प्रकरण - संदीप सर्जेराव जांभळे हा युवक काल सायंकाळी पोवईनाका परिसरातील या गटरात पडला होता. मात्र, बंदिस्त गटारामुळे त्याला बाहेर येता आले नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सातारा, 12 जुलै : सातारा शहरातील जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या (Civil Hospital Satara) बाहेर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भल्या मोठ्या गटरातून एका युवकाला रिक्षा चालकांनी जिवंत बाहेर काढले. (Man in Gutter Satara) संदीप सर्जेराव जांभळे असे या युवकाचे नाव आहे. तो काल सायंकाळी पोवईनाका परिसरातील या गटरात पडला होता. काय आहे संपूर्ण प्रकरण - संदीप सर्जेराव जांभळे हा युवक काल सायंकाळी पोवईनाका परिसरातील या गटरात पडला होता. मात्र, बंदिस्त गटारामुळे त्याला बाहेर येता आले नाही. पावसाच्या पाण्याचा गटारातील प्रवाहामुळे तो आज सकाळी 9.30 वाजता वाहत जिल्हा शासकिय रुग्णालयापर्यंत पोहचला. तेथे थोडेफार गटर फुटलेले असल्यामुळे त्याने तेथून येणाऱ्या जाणाऱ्यांना गटरातून आवाज देण्यास सुरुवात केली. त्याच ठिकाणी काही रिक्षाचालक रिक्षा लावून ग्राहकांची वाट पहात होते. याचवेळी त्यांना गटारातून आवाज ऐकू आला. यानंतर त्यांनी या गटराच्या फटीजवळ जाऊन पाहिले असता आतून एक युवक ओरडत असल्याचे दिसले. त्यानंतर रिक्षाचालकांनी त्याला तसेच पुढच्या फटीपर्यंत येण्यास सांगितले. तेथे फक्त त्याचे तोंड वर येऊ शकले. लोकांनी आपल्याला पाहिल्यामुळे तो आनंदी झाला. त्याने लोकांना मला बाहेर नंतर काढा, पहिल्यांदा पिण्यासाठी पाणी द्या, अशी याचना केली. त्याला लगेचच पाणी पाजण्यात आले. नंतर त्याला बिस्किटही देण्यात आले. एका ठिकाणची फर्शी फोडून त्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले.

संबंधित बातम्या

हेही वाचा -  पुण्यातील धक्कादायक प्रकार; चालता चालता हाय टेन्शन वायरला पाय लागला, तरुणाचा जागीच मृत्यू तोपर्यंत त्याठिकाणी आलेल्या पोलिसांनी त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयातच उपचारासाठी दाखल केले. संदीप हा सातारा तालूक्यातील सांबरवाडी येथील आहे. तो भांडणात पडला, असे त्याने प्राथमिक माहिती पोलिसांना सांगितली आहे. तो नेमका पडला की त्याला मारहाण करुन गटारात टाकण्यात आले, हे मात्र आद्याप समजलेले नाही

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या