JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री, वीज दरात वाढ होण्याची शक्यता

सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री, वीज दरात वाढ होण्याची शक्यता

वीज दरात वाढ होणार असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 15 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती कमकुवत झालेली असतानाच सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या कर्ज स्वरुपातील पॅकेजमुळे ग्राहकांवर बोजा पडणार आहेत. कारण वीज दरात वाढ होणार असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. केंद्र सरकार महाडीस्कॉमला मदत स्वरूपात कर्ज देणार आहे. या कर्जाचा व्याज 6 ते 8 टक्क्यांपर्यंत असेल. याचा भुर्दंड ग्राहकांवर पडेल. मात्र, हे बिनव्याजी कर्ज असावी, अशी मागणी नितीन राऊत यांनी केंद्रीय उर्जामंत्र्यांकडे केली आहे, याबाबत केंद्रीय उर्जामंत्री आता नक्की काय निर्णय घेतात, हे पाहावं लागेल. हेही वाचा- सरकारी कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण हालचाली, लॉकडाऊननंतर मोठा निर्णय होण्याची शक्यता उद्योगांना देण्यात आली वीज बिलात सवलत कोरोना संकटामुळे जगभरातील उद्योग, व्यापार ठप्प आहेत. राज्यावरदेखील याचा विपरित परिणाम झाला आहे. असे असले तरी उद्योग विभागाने ठोस पावलं उचलल्याने उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. रेड झोन वगळता सध्या राज्यात 57 हजार 745 उद्योगांना परवाने दिले असून 25 हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. स्थिर वीज बिलाबाबत उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेतली असून जेवढा विजेचा वापर होईल, तेवढेच बिल आकारण्याचा काही दिवसांपूर्वी निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माहिती दिली होती. संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या