JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक! बॅटमिंटन खेळताना Heart Attack , वयाच्या 44 व्या वर्षी व्यापाऱ्याचा मृत्यू

धक्कादायक! बॅटमिंटन खेळताना Heart Attack , वयाच्या 44 व्या वर्षी व्यापाऱ्याचा मृत्यू

परभणी शहरातील 44 वर्षीय व्यापारी सचिन तापडिया बॅटमिंटन खेळण्यासाठी कोर्टवर आले. तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रतिनिधी विशाल माने, परभणी, २६ ऑगस्ट : बॅटमिंटन खेळण्यासाठी आलेला अचानक एक व्यक्ती खाली कोसळला. नक्की काय झालं हे तिथल्या लोकांनाही समजलं नाही. उपस्थितांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्देवाने त्याचा मृत्यू झाल्याची घटना परभणीतून समोर आली आहे. परभणी शहरातील 44 वर्षीय व्यापारी सचिन तापडिया बॅटमिंटन खेळण्यासाठी कोर्टवर आले. तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

VIDEO| ब्रेकअप केल्याच्या रागातून पेट्रोलपंपावर तरुणीवर जीवघेणा हल्ला

संबंधित बातम्या

44 वर्षीय सचिन तापडिया हे, रोज बॅडमिंटन खेळण्यासाठी परभणीच्या बॅडमिंटन हॉलला येत होते. सकाळी बॅडमिंटनचा पहिला राऊंड पूर्ण केल्यानंतर ते खर्चीवर बसायला जात होते. ते पाणी पित असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. उपस्थित असलेल्या लोकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, मुलगी आणि पत्नी आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या