JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पाऊले चालती पंढरीची वाट...वारीचा कार्यक्रम जाहीर

पाऊले चालती पंढरीची वाट...वारीचा कार्यक्रम जाहीर

या वर्षीचा वारीचा कार्यक्रम जाहीर झालाय. ६ जुलै रोजी ज्ञानोबा रायांच्या पालखीचं प्रस्थान आळंदीहून होणार आहे. तर तुकोबारायांची पालखी ५ जुलै रोजी देहूमधून प्रस्थान ठेवेल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पंढरपूर, 29 मे : पावसाच्या आगमनाबरोबरच अवघ्या राज्याला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. यावर्षीचा वारीचा कार्यक्रम जाहीर झालाय. ६ जुलै रोजी ज्ञानोबा रायांच्या पालखीचं प्रस्थान आळंदीहून होणार आहे. तर तुकोबारायांची पालखी ५ जुलै रोजी देहूमधून प्रस्थान ठेवेल. १७ दिवसांचा प्रवास करून या पालख्या पंढरपूरमध्ये आषाढीच्या पूर्वसंध्येला म्हणजेत २२ जुलै रोजी पंढरपुरात पोहचतील. २३ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. माऊलींच्या पालखीचा कार्यक्रम 6 जुलै- आळंदीतून पालखीचं प्रस्थान 7 आणि 8 जुलै- पुणे मुक्काम 9 आणि 10 जुलै- सासवड मुक्काम 11 जुलै -जेजुरी मुक्काम 12 जुलै- वाल्हे मुक्काम 13 जुलै - निरा स्नान करुन लोणंदला पालखी मुक्काम 14 जुलै - लोणंदला (चांदोबाचा लिंब) पहिले उभे रिंगण 15 जुलै- फलटण मुक्काम 16 जुलै- बरड मुक्काम 17 जुलै-  माऊलींच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश 17 जुलै- नातेपुते मुक्काम 18  जुलै- मांडवी ओढाला (पुरंदावडे)  पहिलं गोल रिंगण 19 जुलै-खुडूस (ज्ञानेश्वर नगर-विझोरी) इथं दुसरे गोल रिंगण पालखी वेळापूरला विसावणार 20 जुलै- तोंडले-बोंडले इथं तिसरे गोल रिंगण पालखी भंडीशेगांव मुक्कामी 21 जुलै- भंडीशेगांवचे उभे रिंगण बाजीराव विहिरीवर गोल रिंगण सोहळा 22 जुलै- माऊलींच्या पादुकांचे उभे रिंगण पालखीचा पंढरीनगरीत प्रवेश

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या