JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sushama Andhare : प्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात जिलेबी… ठाकरेंवर, शिंदे गटाकडून प्रहार

Sushama Andhare : प्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात जिलेबी… ठाकरेंवर, शिंदे गटाकडून प्रहार

सुषमा अंधारे यांची प्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात जिलेबी वाटण्याचा कार्यक्रम असल्याची टीका उस्मानाबाद जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते अनिल खोचरे यांनी केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उस्मानाबाद, 08 डिसेंबर : सुषमा अंधारे यांची प्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात जिलेबी वाटण्याचा कार्यक्रम असल्याची टीका उस्मानाबाद जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते अनिल खोचरे यांनी केली आहे. सुषमा अंधारे यांना शिवसैनिकांवर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. असा समाचार शिवसेनेचे नेते अनिल खोचरे यांनी घेतला आहे. गेली दोन दिवस सुषमा अंधारे यांची प्रबोधन यात्रा उस्मानाबाद जिल्ह्यात होती.

हे ही वाचा :  ‘तुरुंगातल्या कैद्यांकडून अशी वाक्य घेऊन आले’, भाजपचा संजय राऊतांवर पलटवार

यावेळी आंधरे यांनी शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले व आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचा खरपूस समाचार घेतला. आज  शिंदे गटाच्यावतीने अनिल खोचरे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. हिंदू देव देवता बद्दल अपमानकारक वक्तव्य केली.

संबंधित बातम्या

गेल्या वर्षभरात त्यांचं नेमकं काय प्रबोधन झालं? त्यांनी शिवसेनेसाठी काय योगदान दिलं? त्यांना शिवसैनिकांवर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांची प्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात जिलेबी वाटण्याचा कार्यक्रम असल्याची टीका अनिल खोदरे यांनी केली आहे.  

हे ही वाचा :  ‘दीपाली सय्यदचं पाकिस्तान-दुबई कनेक्शन’, कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप

उद्धव ठाकरे गटाचे धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख अनिल खोचरे यांनी काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. अनिल खोचरे यांचे पक्षांतर हे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातो.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या