JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यात पुन्हा वाढली कोरोनाबाधितांची संख्या, 6 महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर

पुण्यात पुन्हा वाढली कोरोनाबाधितांची संख्या, 6 महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर

पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1184 इतकी झाली आहे.

जाहिरात

देशभरातील ज्या शहरांतील कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश आहे. त्यातच शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. आता मात्र यामध्ये काहीसा बदल होणार आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 26 एप्रिल : पुणे परिसरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही. पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. मात्र तरीही पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1184 इतकी झाली आहे. जिल्ह्यात एकूण 72 जण मृत्यूमुखी पडले असून एकट्या पुणे शहरात काल 5 रुग्ण मरण पावले तर काल दिवसभरात 90 रुग्ण वाढले आहेत. कोरोना व्हायरस : पुण्यातील महत्त्वाचे 6 अपडेट्स (25 एप्रिल 2020 रात्री 9 वाजताची आकडेवारी) पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1184 - पुणे शहरातील रुग्णांची संख्या 1044 - काल दिवसभरात पुण्यात 90 रूग्णांची वाढ तर 5 रूग्णांचा मृत्यू - पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णांची संख्या 79 - पुणे ग्रामीण रुग्णांची संख्या 33 (हवेली- 18, जुन्नर- 1, शिरूर- 2, मुळशी- 1, भोर- 2, वेल्हा- 8, बारामती- 1) - काँटोमेन्ट व नगरपालिका हद्दीतील रुग्णांची संख्या 28 वर…(बारामती नगरपालिका- 7 व काँटोमेन्ट- 21) पुणे जिल्ह्यातील मृत्यूची संख्या 72 - पुणे शहरातील मृत्यू संख्या 67 - पिंपरी चिंचवड शहरातील मृत्यू संख्या 3 - काँटोमेन्ट व नगरपालिका हद्दीतील मृत्यू संख्या 2 वर.. - पुणे ग्रामीण मध्ये आजतागायत मृत्यू नाही… पुणे जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 182 - पुणे शहरातील कोरोना मुक्त रुग्णांची संख्या 156 - पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना मुक्त रुग्णांची संख्या 21 वर.. - काँटोमेन्ट व नगरपालिका हद्दीतील कोरोना मुक्त रुग्णांची संख्या 5 वर.. आज पर्यंत पुणे जिल्ह्यातील सॅम्पल टेस्टिंग संख्या 10955 आज पर्यंत आलेल्या सॅम्पलचा रिझल्ट संख्या 10479 अ‍ॅडमिट झालेल्या नागरिकांची संख्या आजपर्यंत पुणे जिल्ह्यातील अ‍ॅडमिट झालेल्या नागरिकांची संख्या 10955 तर डीचार्ज दिलेल्या नागरिकांची संख्या 9472 इतकी आहे. क्रिटिकल रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यातील क्रिटिकल रुग्णांची संख्या 45 इतकी आहे(पुणे महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये 15 आणि ससून मध्ये 30)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या