JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'एकदम लॉकडाऊन संपणार नाही, तर...', अखेर आरोग्यमंत्र्यांनीच केलं स्पष्ट

'एकदम लॉकडाऊन संपणार नाही, तर...', अखेर आरोग्यमंत्र्यांनीच केलं स्पष्ट

महाराष्ट्रात लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये 14 एप्रिलनंतरही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 एप्रिल : जगासाठी डोकेदुखी ठरत असलेल्या कोरोना व्हायरच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रातही झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 690 वर पोहोचला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये 14 एप्रिलनंतरही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत भाष्य केलं आहे. ‘इतर शहराच्या तुलनेत मुंबईत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या जास्त वाढताना दिसत आहे. ही काळजीची गोष्ट असून लोकांनी बाहेर पडू नका, खबरदारी घ्या. एकदम लॉकडाऊन संपणार नाही. जिथं काहीच नाही तिथं प्रथम लॉकडाऊन हटवला जाईल. पण जिथं संख्या जास्त तिथं वेगळा विचार करून निर्णय घेतला जाईल. आज दिवे लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यात विज्ञान नाही, पण देशांचा ऐक्य विषय असावा, लोकांनी गर्दी करू नये इतकंच अपेक्षित आहे,’ अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनीच आता थेट लॉकडाऊन वाढवण्याबाबतचे संकेत दिल्याने महाराष्ट्रातील ही लॉकडाऊनचा कालावधी वाढणार हे निश्चित आहे. मात्र काही जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शिथिल केला जाण्याची शक्यता आहे. कारण जिथं रुग्णांची संख्या कमी आहे, तेथील लॉकडाऊनबद्दल विचार केला जाईल, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत. त्यामुळे 14 एप्रिलनंतर सरकार नेमका निर्णय घेणार, हे पाहावं लागेल. ‘कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन ठेवण्याची गरज’ ‘कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या भागातच फक्त लॉकडाऊन संपवण्याची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये सर्व जिल्हे कोरोना प्रभावित नाहीत. त्यामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लॉक करणे काही अर्थ नाही. फक्त हॉट स्पॉट असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन सुरू राहील,’ असं आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या