नाशिक 4 ऑगस्ट : मासिक पाळी (Menstrual cycle ) संदर्भात आज ही समाजात फारसं बोलल जात नाही. अनेक ठिकाणी मासिक पाळी हा विटाळ मानला जातो. काही घरांमध्ये मासिक पाळी आलेल्या महिलांना दूर ठेवलं जातं. मात्र, याच मासिक पाळी संदर्भात समाजात जनजागृती होण्यासाठी नाशिकमध्ये (Nashik) अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यवाहक कृष्णा चांदगुडे (Krushna Chandgude) यांनी आपली मुलगी यशदा (Yashda) हिला प्रथम मासिक पाळी आली म्हणून मासिक पाळी महोत्सवाचे आयोजन केले होते. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. कृष्णा चांदगुडे हे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अनेक जाचक रूढी परंपरा यांना मूठमाती देण्याचं काम गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहेत. मासिक पाळी संदर्भात ही जनजागृती व्हावी. त्याच महत्व सर्वांना कळावे म्हणून या कार्यक्रमातून शॉर्ट फिल्म, मासिक पाळी वरील जनजागृतीपर गीत, व्याख्यान आयोजित करून प्रबोधन करण्यात आले. यशदाच सर्व महिलांनी या महोत्सवात औक्षण करत स्वागत केलं. तिला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. Aurangabad : News18 Local च्या बातमीचा दणका; BAMU मधील बंद कँटीन सुरु, पाहा VIDEO मासिक पाळी म्हणजे काय ? मुलगी, स्री वयात आल्यावर तिच्या योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो त्याला मासिक पाळी असे म्हणतात. साधारणतः मुलगी 12-13 वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरू होते. कधी कधी या अगोदरही सुरू होऊ शकते. ही नैसर्गिक प्रक्रिया असते. मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आज माझ्या वडिलांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे. यामुळे मला खरच खूप आनंद झाला. आज ही समाजात या विषयावर बोलल जात नाही. सर्वच आपल्याला गप्प बसायला सांगतात. मात्र आज हा कार्यक्रम घेतला गेला आहे. आनंद वाटतोय की यामुळे तरी जनजागृती होईल, असे मत यशदा चांदगुडे हिने व्यक्त केले आहे. अशा विषयांवर मुक्त चर्चा होण्याची गरज आहे. मात्र ते होताना दिसत नाही. चांदगुडे परिवाराने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले. मासिक पाळी विषयी समाजात जनजागृती होण्याची गरज आहे. शहरात काही प्रमाणात का होईना महिलांना, मुलींना माहिती आहे. मात्र ग्रामीण भागात याची माहिती जास्त नाही. मासिक पाळी आली की महिलांना दूर ठेवलं जातं. त्यांना कुठे शिवू दिलं जात नाही. या जाचक परंपरा आज ही सुरू आहेत. त्यामुळे जनजागृती होऊन बदल होण्याची गरज आहे मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे सर्वांना कळलं पाहिजे, अशी भावना समाजसेविका कोमल वर्दे यांनी व्यक्त केली.