नाशिक, 02 नोव्हेंबर : आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता यशाचं कोणतही शिखर गाठण्यासाठी आपल्या मनात जिद्द आणि चिकाटी जर असेल ना तर खडतर परिस्थितीतही आपण सहज यश प्राप्त करू शकतो. हे पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल मागील महिन्यात राष्ट्रपती पदकाने सन्मानित झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांनी दाखवून दिले आहे. आपल्या कुशल कामगिरीने महाराष्ट्र पोलीस दलाची शान वाढविणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे यांचा आजपर्यंतचा प्रवास अतिशय थरारक आहे. खडतर परिस्थितीत त्यांनी यशाला गवसणी घातलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील लोणी हवेली हे त्यांचं मूळगाव आई,वडील,आणि चार भाऊ अस त्यांचं कुटुंब,आर्थिक परिस्थिती तशी बेताची. मात्र, आपल्या मुलाने शिकून मोठ व्हावं ही आई वडिलांची इच्छा होती. सिताराम यांना ही लहान पणापासून शाळेची आवड होती. त्यांचं प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी हे मूळगावी लोणी हवेली इथेच झाल. त्यानंतर पुढील आठवी ते दहावी शिक्षण त्यांनी पारनेर इथे केले. मात्र तेव्हा वाहनांची व्यवस्था नसल्यामुळे गाव ते पारनेर असं जवळपास 12 किलोमीटरचं अंतर दररोज पायी ये-जा करत होते.
Success Story : दहावीतच दृष्टी गेली पण हार मानली नाही, जिद्दीनं मिळवली सरकारी नोकरी!
आपल्या शिक्षणासाठी आई वडिलांची मेहनत बघता ते चांगले अभ्यास करत होते. पुढे जाऊन दहावीच्या बोर्डात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर आई वडिलांसह गावातील नागरिकांना खूप आनंद झाला. त्यांनी आनंदाच्या भरात बैलगाडीवरून सिताराम यांची मिरवणूक काढली आणि हाच क्षण त्यांच्यासाठी लाख मोलाचा ठरला आणि अजून मेहनत करून काही तरी करून दाखवण्याची जिद्द त्यांच्या मनात पक्की झाली. पुढे अहमदनगर मध्ये जाऊन अधिक जोमाने पुढील अभ्यास सुरू केला. असा सुरू झाला MPSC चा प्रवास पुण्यात M.SC शिक्षण घेत असताना पोलीस दलाविषयी अधिक माहिती मिळाली आणि आपण ही पोलीस दलात चांगल्या पदावर भरती व्हायचं म्हणून विचार सुरू केला. त्याचवेळी ग्रामीण भागातील काही मुल एमपीएसएसी मधून भरती होत होती. त्यामुळे अधिक प्रेरणा मिळाली आणि दिवसरात्र एक करून अभ्यास केला आणि 1992 साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात नियुक्ती झाली. यावेळी लोणी हवेली गावातून प्रथमच पोलीस अधिकारी म्हणून जॉईन झाल्यामुळे सर्वच नागरिकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित डॉ सिताराम कोल्हे यांनी अतिशय चांगल काम केलं आहे. नॅशनल व इंटरनॅशनल जर्नलस मध्ये 14 रिसर्च पेपर प्रकाशित केले आहेत. दोन वर्षे सातत्याने दक्षता मासिकातून लिखाण केले आहे. विद्यार्थी व पोलीस दलातील नवीन अधिकारी,कर्मचारी यांच्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यान दिली आहेत. डॉ सिताराम कोल्हे यांनी अमरावती,नागपूर,जळगाव,नंदुरबार,नाशिक - ग्रामीण, सीआयडी,विशेष सुरक्षा विभाग,आणि सद्या नाशिक शहरातील पंचवटी पोलीस स्टेशन इथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत.
झोपडी ते ताज पॅलेस : ‘मला पैसे नकोत तर…’ कोळीवाड्यातील तरूणाने जिंकलं टाटांचं मन, Video
आतापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस केले आहेत. त्यांच्या चांगल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना 700 बक्षिसे 125 प्रशंसापत्रे मिळाली असून पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह तसेच प्रतिष्ठेचा गिरणा गौरव पुरस्कार ही त्यांना मिळाला आहे. एकूण 28 वर्षांच्या काळातील चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना पोलीस दलातील सर्वोच्च सन्मानाच्या राष्ट्रपती पदकाने मागील महिन्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. एक वेळ अशी होती की परीक्षेला जाण्यासाठी देखील पैसे नव्हते डॉ सिताराम कोल्हे यांनी त्यांच्या संघर्षमय जीवनातील एक प्रसंग सांगितला आहे. ते म्हणतात की परीक्षेसाठी अहमदनगरहून पुण्याला जायचे होते. मात्र आर्थिक परिस्थिती इतकी खडतर होती की भाड्यासाठी पैसे नव्हते.मित्रांकडून इकडून तिकडून 200 रुपये जमा केले ते ही खर्च होऊन गेले. मग अशा वेळी करायचं काय ? तर नगरहून पुण्याला एक कांद्याची भरलेली गाडी जात होती. अक्षरशः त्या गाडीत कसबस बसून मी पुणे गाठल आणि परीक्षा दिली. असे अनेक कठीण प्रसंग मी माझ्या जीवनात अनुभवले आहेत, असं डॉ सिताराम कोल्हे सांगतात.