JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik : शेततळ्याजवळ गेला अन् जीवाला मुकला, नीट जगही न पाहिलेल्या नाशिकच्या चिमुकल्या देवांशवर काळाचा घाला

Nashik : शेततळ्याजवळ गेला अन् जीवाला मुकला, नीट जगही न पाहिलेल्या नाशिकच्या चिमुकल्या देवांशवर काळाचा घाला

नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील रायते चिचोंडी रस्त्यावर राहत असलेले उपाध्ये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 27 डिसेंबर : नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील चिंचोडी येथे धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. येवला तालुक्यात पाण्याचा साठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेततळे बांधण्यात आले आहेत. दरम्यान  येवला तालुक्यातील रायते चिचोंडी रस्त्यावर राहत असलेले उपाध्ये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घराच्या पाठीमागे असलेल्या छोट्याशा शेततळ्यात अडीच वर्षाचा मुलगा देवांशचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने चिंचोडी भागात शोककळा पसरली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, येवला तालुक्यातील चिचोंडी येथील उपाध्ये कुटुंबीय शेतात राहतात. दरम्यान त्यांनी शेतीच्या कामासाठी घराच्या मागच्या बाजूला छोटे शेततळे बांधले आहे. या शेततळ्यात उपाध्ये यांच्या घरातील घराच्या पाठीमागे असलेल्या छोट्याशा शेततळ्यात अडीच वर्षाचा मुलगा देवांशचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने चिंचोडी भागात शोककळा पसरली आहे.

दरम्यान अडीच वर्षाच्या चिमुकल्या देवांशने हे जगही नीट पाहिले नव्हते मात्र दुर्दैवी घटनेमुळे तो या जगातून आता कायमचा निघून गेला. या घटनेमुळे चिचोंडी व रायते गावावर शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या

गर्भवती महिलेची विहिरीत उडी, पाण्यात पडताच दिला बाळाला जन्म

चंद्रपूरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात सुमठाना गावात एका 9 महिन्याच्या गर्भवती महिलेनं विहिरीत उडी घेतली. हैराण करणारी बाब म्हणजे पाण्यात उडी घेताच तिने बाळाला जन्म दिला. यात दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

जाहिरात

हे ही वाचा :  बहिणीची सोयरीक मोडल्याचा जाब विचारायला गेला तो परतलाच नाही; लातूरच्या घटनेने खळबळ

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती तिसऱ्यांदा गर्भवती राहिली तेव्हा तिला सतत या गोष्टीची भीती होती, की या बाळासोबतही काही विपरित घडू नये. याशिवाय गावातील कोणीही तिला भेटायला आलं की आधीच्या मुलांबद्दल बोलायचे आणि तिसऱ्या बाळाबद्दलही चर्चा करायचे. गावातील लोकांचं म्हणणं आहे, की निकिताच्या या अवस्थेमुळे घरातील लोक सतत तिच्या आसपास राहायचे आणि तिची काळजी घ्यायचे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या