JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: मांजर समजून बिबट्याच्या बछड्यासह खेळत होते चिमुकले

VIDEO: मांजर समजून बिबट्याच्या बछड्यासह खेळत होते चिमुकले

नाशिकच्या मालेगाव मधील.. ही बातमी ऐकून तुमच्या ही अंगावर काटा येईल.मांजर समजून चक्क बिबट्याच्या बछड्यासोबत दीड वर्षाच्या मुलीची जमली गट्टी !

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मालेगाव तालुक्यातील मोरदर शिवारातील घटना.. रावसाहेब ठाकरे यांच्या घराजवळ बिबट्याचा बछडा आढळला.. मांजर समजून चक्क बिबट्याच्या बछड्यासोबत खेळत होती लहान मुल.. ठाकरे यांच्या दीड वर्षाच्या नातीची जमली बछड्या सोबत गट्टी ! दूध पाजून जवळपास आठवडाभर ठाकरे कुटुंबाने केला बछड्याचा सांभाळ वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही, अशी एक बातमी समोर आली आहे. तुम्ही कधी कल्पना केली आहे का, मांजर, कुत्रा नाही तर थेट बिबट्याचा बछडा (Leopard Calf) तुमच्या घरी राहतोय. घरचे सर्व त्याला खूप प्रेम करताय. त्याच्या सर्वांशी खूप गट्टी जमली आहे, नाही ना. पण हे खरं आहे. वाचून तुम्हाला धक्का बसेल. पण हो, ही घटना मालेगावच्या (Malegaon) मोरदर शिवारात घडली आहे. नेमके काय घडलं? मालेगावच्या मोरदर शिवारातील रावसाहेब ठाकरे यांचे शेत आहे. शेतातच त्यांचे घर आहे. या घरासमोरील अंगणात लहान मुले खेळत होती. यावेळी त्यांना मांजर सापडली या आनंदात सर्वजण तिच्याशी खेळू लागले. इतकेच नव्हे तर या या मुलांची तिच्याशी छान गट्टीही जमली. मात्र, नंतर भलताच प्रकार समोर आला. घरातील मोठ्या लोकांनी या पाहुण्याला न्याहाळले तेव्हा ती मांजर नव्हे, तर चक्क बिबट्याचा बछडा आहे, असे सर्वांच्या लक्षात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या