JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गर्दीच्या ठिकाणीच वडापाव विक्रेत्यांवर कोयत्यानं हल्ला, घटनेनं नाशिक हादरलं, Live Video

गर्दीच्या ठिकाणीच वडापाव विक्रेत्यांवर कोयत्यानं हल्ला, घटनेनं नाशिक हादरलं, Live Video

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

जाहिरात

Photo - cctv footage

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 26 नोव्हेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अनेक हत्येच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये कोयत्याचा नंगानाच पाहायला मिळाला आहे. वडापाव विक्रेत्यांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - नाशिकरोड येथील शाहुपथ येथे ही कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेचा संपूर्ण थरार हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. विशाल गोसावी या वडापाव विक्रेत्यावर अज्ञातांनी कोयत्याने हल्ला केला. खुन्नसने का बघतो म्हणून विचारणा करत त्याला मारहाणही केली. तर तेजस गोसावी वडापाव गाडीवर मिळून न आल्याने त्याचे दाजी विशाल गोसावी यांना मारहाण करण्यात आली. तेजस गोसावी मिळाला नाही म्हणून नंतर त्याच्या घरी जाऊन दगडफेक केल्याचीही घटना समोर आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

भावासोबत झालेल्या भांडणाचा राग चिमुकल्यावर काढला - 

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आधार तीर्थ आश्रमात एका चार वर्षीय बालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 23 नोव्हेंबरला समोर आली होती. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं या आश्रम शाळेत राहतात, त्यामुळे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. यानंतर या घटनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या घटनेचा तपास त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून सुरू आहे. या आधार आश्रमातील हत्येप्रकरणी अल्पवयीन संशयिताला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आधार आश्रमात एका चार वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या करण्यात आली. मोठ्या भावासोबत झालेल्या भांडणाचा राग काढण्यासाठी चार वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केल्याची कबुली आरोपी अल्पवयीन मुलाने दिली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन संशयिताला याप्रकरणी अटक कली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या