JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सासरच्या जाचाला कंटाळून तरुणाने संपवलं आयुष्य, व्हिडीओ शूट करून घेतली विहिरीत उडी

सासरच्या जाचाला कंटाळून तरुणाने संपवलं आयुष्य, व्हिडीओ शूट करून घेतली विहिरीत उडी

सासरच्या लोकांनी मारहाण करत टॉर्चर केल्याने आत्महत्या करत असल्याची व्हिडीओमध्ये माहिती दिली. या व्यक्तीनं स्वतःच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लक्ष्मण घाटोळ, नाशिक : सासरच्या जाचाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली आहे. नाशिकच्या ओझर सोनेवाडी येथील 39 वर्षीय युवकाने व्हिडिओ काढून आत्महत्या केली आहे. या व्हिडीओ त्यांनी सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. सासरच्या लोकांनी मारहाण करत टॉर्चर केल्याने आत्महत्या करत असल्याची व्हिडीओमध्ये माहिती दिली. या व्यक्तीनं स्वतःच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. हिरामण अशोक लवांड असं मृत व्यक्तीचं नाव आहे. हिरामण काय म्हणाले? हा व्हिडीओ माझ्या बहिणीसाठी आहे. माझी सख्खी आई माझ्या जाण्यानंतर जगली वाचली तर माझ्या बहिणीनं तिला सांभाळावं एवढीच इच्छा आहे. मी हिरामण अशोक लवांड मी न दारू पिता आत्महत्येचा प्लॅन केला आहे. आत्महत्येला कारणीभूत माझे सासरे माझा मेहुणा आणि तो एक शुभम ढोबळे आहेत. त्यांनी मला आणि माझ्या मुलाला टॉर्चर केलं खूप मारलं. माझ्या अंत्यसंस्कारांना त्यांना बोलवू नये. मी माझ्याच विहिरीत जीव देत आहे. माझ्या आत्महत्येला अजून एक कारणीभूत आहे मात्र मी त्याचं नाव सांगू शकत नाही. कारण ती व्यक्ती माझ्या मुलांना त्रास देईल असं हिरामणराव यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या