गडचिरोली, 27 सप्टेंबर : वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप आहे. अनेकदा खड्डे, रस्त्यांचे बांधकाम तर कधी मोठ-मोठ्या वाहनांच्या निष्काळजीपणामुळे अपघात होतात आणि यात अनेकांना जीव गमवावे लागतात. गडचिरोलीतून अशीच एक घटना समोर आली आहे. जड वाहनाच्या धडकेमुळे येथे एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेच्या मृत्युनंतर संतप्त जमावाने दहा ट्रक पेटवले. मूलचेरा तालुक्यातील शांतीग्राम येथील ही दृश्य आहेत. VIDEO : पुण्यातली अतिशय वेदनादायी घटना, आईने पोटच्या लेकराला ट्र्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली जाताना पाहिलं सुरजागड खाणीतील लोह खनिज प्रकल्पाच्या अवजड वाहनामुळे हा अपघात घडला असून यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. संतप्त जमावाने या लोह खनिजाची मालवाहतूक करणारे दहा ट्रक पेटवून दिले.
गेल्या काही दिवसांपासून या लोहखनिजाची वाहतूक करणा-या ट्रकांकडून सतत अपघात सुरू आहेत. यासाठी पर्यायी रस्ता तयार करून वाहतूक करण्याची नागरीकांची मागणी होती. आज अपघातानंतर जनतेने संताप व्यक्त केला.