JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / यवतमाळ : शेवटी तिनेच घेतला बदला, अत्याचार करणाऱ्यावर न्यायालयात सपासप कटरने वार

यवतमाळ : शेवटी तिनेच घेतला बदला, अत्याचार करणाऱ्यावर न्यायालयात सपासप कटरने वार

विशाल शेंडे हा एका महिलेवरील अत्याचार प्रकरणात आरोपी आहे.

जाहिरात

file photo

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

यवतमाळ, 14 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. तसेच अनैतिक संबंधातून हत्येच्याही घटना वाढत आहेत. यातच यवतमाळ जिल्ह्यातून एक घटना समोर आली आहे. न्यायालयाच्या आवारात आरोपीवर फिर्यादी महिलेने कटरने हल्ला केला. विशाल शेंडे असे आरोपीचे नाव आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - यवतमाळमध्ये न्यायालयाच्या आवारामध्ये एका आरोपीवर महिलेने कटरने हल्ला केल्याची घटना घडली आहे. विशाल शेंडे असे जखमीचे नाव आहे. विशाल शेंडे हा एका महिलेवरील अत्याचार प्रकरणात आरोपी आहे. आज विशालची हजेरी न्यायालयात होती. यावेळी फिर्यादी महिला त्या ठिकाणी आली आणि त्या महिलेने आरोपीवर कटरने वार करून हल्ला केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत महिलेला ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आवारात झालेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या