JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुलाच्या वादात मध्यस्थी केली, थेट गळा आवळत पित्याचाच खून, यवतमाळेतील धक्कादायक प्रकार

मुलाच्या वादात मध्यस्थी केली, थेट गळा आवळत पित्याचाच खून, यवतमाळेतील धक्कादायक प्रकार

संजय किसन बडदे (वय -55, रा. मुलकी) असे मृताचे नाव आहे. तर अमोल खेड (वय-24, रा. रामकृष्णनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

यवतमाळ, 27 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच आता यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलाच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या पित्याचा करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - यवतमाळ शहरातील मुलकी परिसरात मुलाचा व एका युवकाचा वाद झाला . हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पित्यावरच आरोपीने चाकूने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय किसन बडदे (वय -55, रा. मुलकी) असे मृताचे नाव आहे. तर अमोल खेड (वय-24, रा. रामकृष्णनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. संजय बडदे यांच्या मुलाचा अमोल खेड याच्याशी वाद झाला होता. यानंतर अमोल हा बडदे यांच्या मुलाला मारण्यासाठी दोन वेळा घरावर चालून आला. यावेळी त्याची समजूत काढून परत त्याला पाठविण्यात आले. मात्र, तरीसुद्धा अमोलच्या डोक्यातील राग शांत झाला नाही. त्यामुळे तो धारदार चाकू घेवून पुन्हा बडदे यांच्या घरापुढे आला. यावेळी पुन्हा संजय बडदे हे अमोलची समजूत घालण्यासाठी आले. मात्र, अमोलने त्यांच्यावर गळा दाबून चाकूने वार केले. यात संजय बडदे यांचा जागीच मृत्यू झाला. याच गंभीर अवस्थेत गंभीर त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. हेही वाचा -  रस्ते अपघातात महिलेचा मृत्यू; संतप्त गावकऱ्यांनी 10 ट्रक पेटवून दिले, धक्कादायक Video दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तसेच या प्रकरणाची लगेच चौकशी करीत संशयित अमोल खेड याला ताब्यात घेतले. यानंतर याप्रकरणी संजय बडदे यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अवधूतवाडी पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या