नागपूर, 14 जानेवारी : वर्षाच्या सुरुवाती साजरा होणारा आणि तिळगूळ देत गोडवा वाढवणारा सण म्हणजे मकर संक्रांत होय. याचं सणानिमित्त पतंग उडवून आनंद साजरा केला जातो. पतंग उडवताना विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने किंवा मोठ्या इमारतीवरून तोल गेल्याच्या अनेक दुर्घटना घडतात. त्यामुळे हा आनंद साजरा करत असताना काळजी देखील घेणे आवश्यक आहे. आज घडीला शहरात मेट्रोच्या 25000 व्होल्ट विजेच्या तारा आहेत. यात पतंग अडकली तर पतंग उडवणाऱ्यांपर्यंत याचा करंट पोहचू शकोत. यात त्याचा जागीच कोळसा होऊ शकतो, असा खबरदारीचा इशारा नागपूर महामेट्रोच्या वतीने देण्यात आला आहे. मकर संक्रांतीनिमित्त आकाशात पतंग उडवणाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह बघायला मिळतो. मात्र, सध्या शासनाने प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजामुळे अनेक अपघात होत आहेत. या ना त्या मार्गाने अथवा जास्त पैसे देऊन नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचे चित्र आहे. 25000 व्होल्टचा खतरा नायलॉन मांजाचा वापर करताना कोणी आढळून आल्यास त्यावर जागीच गुन्हा नोंदवण्याचे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. यासह आज घडीला ऑटोमॅटिक चौक ते मिहान आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर या 40 किलोमीटरच्या मार्गावर सध्या मेट्रो धावत आहे. या मेट्रो ट्रेनच्या तारांमध्ये 25000 व्होल्ट विद्युत प्रवाह वाहत आहे. त्यामुळे या परिसरात पतंग उडवताना काळजी घेणे आवश्यक आहे.
मांजातून देखील करंट नुकतेच लोकमान्यनगर मेट्रो स्थानकात नायलॉन मांजा पँटोग्राफमध्ये अडकला होता. हा मांजा अडकल्याने आणि मेट्रो काही काळ थांबल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. मेट्रो ट्रेनचे संचालन 25 हजार व्होल्ट विद्युत प्रवाहाच्या माध्यमाने होते. हल्ली वापरण्यात येणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन मांजामध्ये धातू मिश्रित घटक असल्याने विद्युत प्रवाह सुरू असताना पतंगाचा मांजा या विद्युत तारांमध्ये अडकल्यास त्यातून प्रवाहित होणारा करंट पतंग उडविणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. आणि त्यातून मोठी दुर्घटना घडू शकते. शहरात वीज वितरणाच्या लघू व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरले आहे अनेकदा पतंग उडविताना किंवा पतंग कटून आल्यानंतर विजेच्या तारांमध्ये किंवा खांबांवर अडकतो. असा पतंग लोखंडी सळईच्या किंवा गिरगोटच्या मदतीने काढण्या प्रयत्न धोकादायक आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी महामेट्रो नागपूरच्या प्रवासी सेवा सकाळी ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत दर १५ मिनिटांनी उपलब्ध आहेत. ऑरेंज लाईन मार्गावर खापरी, न्यू एयरपोर्ट, एयरपोर्ट, साउथ एयरपोर्ट, एअरपोर्ट, उज्वलनगर, जयप्रकाशनगर, छत्रपती चौक, अजनी चौक, रहाटे कॉलनी, काँग्रेस नगर, सीताबर्डी इंटरचेंज, झिरो माईल फ्रिडम पार्क, कस्तुरचंद पार्क, गड्डीगोदाम, कडबी चौक, नारी रोड आणि अँटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन. 50 वर्षांपासून पतंग तयार करणारी नागपुरातील कुटुंब, पाहा Video अॅक्वा लाइन मार्गावर प्रजापतीनगर, वैष्णोदेवी चौक, आंबेडकर चौक, टेलिफोन एक्स्चेंज चौक, चितारओळी, अग्रसेन चौक, दोसर वैश्य चौक, नागपूर रेल्वे स्टेशन, सीताबर्डी इंटरचेंज, झाशी राणी चौक, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, शंकरनगर चौक, एलएडी चौक, धरमपेठ कॉलेज, सुभाषनगर, रचना रिंग रोड जंक्शन, वासुदेव नगर, बसीनगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या भागात पतंग उडवताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन मेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे.