नागपूर, 14 जानेवारी : मकर संक्रांती निमित्त पतंग उडवण्यासाठी अगदी लहानांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत उत्साह बघायला मिळतो. एकमेकांची पतंग दोऱ्याने कापून हर्ष साजरा करण्याची परंपरा चालत आलेली आहे. मात्र त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे अनेक गंभीर घटना समोर येतात. त्यामुळे नागपुरातील एका वैज्ञानिकानं एक भन्नाट जुगाड शोधलं आहे. अगदी 10 रुपयात तयार झालेल्या गॅझेटद्वारे लाखमोलाचा जीव वाचू शकतो. नागपुरातील तरुण वैज्ञानिक अजिंक्य कोत्तावार यांनी ‘यु’ आकाराचे अनोखे गॅझेट तयार केले आहे. साध्या तारेने अवघ्या दहा रुपयात तयार होणारे हे जुगाड दुचाकीस्वाराला जीवघेण्या मांजापासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. अशी सुचली कल्पना काही वर्षांपूर्वी गुजरात येथील बडोद्यात इनोव्हेन्शन कौन्सिल सोबत काम करत असताना पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजा आणि त्यातून होणारे अपघात या विषयांवरील समस्या आमच्या पुढे आल्या. त्यावर सातत्याने आम्ही काही उपाय शोधत होतो. त्यातून ही संकल्पना अस्तित्वात आल्याचे अजिक्य सांगतात.
आजघडीला इतर शहरांप्रमाणे नागपुरात देखील ही समस्या अधिक प्रकर्षाने जाणवते आहे. गेल्या काही दिवसात अनेक अपघात देखील झाले आहे. यावर खबरदारी म्हणून ही एक छोटीशी युक्ती आपला अमूल्य जीव वाचवण्यासाठी मोठी उपयुक्त ठरू शकते. असे करते काम गाडीच्या आरशाला साध्या अर्थिंग तारेच्या साह्याने यु आकारात तार मोल्ड करून लावल्यास समोरून येणाऱ्या मांजा दुचाकी स्वराला स्पर्श करण्याआधी या तारेला स्पर्श करेल. गाडी वेगात असली तरी या तारेच्या माध्यमातून धागा वरच्यावर निघून जाईल अशाने दुचाकी स्वराचा जीव वाचू शकतो. अतिशय साधी आणि सरळ सोपी आणि अवघ्या दहा ते पंधरा रुपयात तयार होणारी ही संकल्पना फार असरदार असून अनेक लोक या दिवसांमध्ये अंमलबजावणी करताना दिसत आहे. पतंग उडवताना सावधान! ‘ही’ चूक केल्यास बसेल 25000 व्होल्टचा झटका प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे आपण अनेक समस्या अनुभवत आहोत. यातून अनेक अपघात देखील झाले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ही संकल्पना प्रत्येकाने आत्मसात केली तर अपघात होण्याची शक्यता फार कामी आहे, अशी माहिती नागपुरातील युवा वैज्ञानिक व गोंडवाना विद्यापीठाचे राज्यपाल प्रतिनिधी अजिंक्य कोत्तावार यांनी दिली.