JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भंडारा : डोळ्यादेखत उभं पीक उद्धवस्त झाल्याने खचला शेतकरी; तणावात उचललं टोकाचं पाऊल

भंडारा : डोळ्यादेखत उभं पीक उद्धवस्त झाल्याने खचला शेतकरी; तणावात उचललं टोकाचं पाऊल

गोविंदराव दाणी यांच्याकडे किन्ही गुंजेपार शिवारात सहा एकर शेती आहे.

जाहिरात

फाईल फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भंडारा, 30 ऑगस्ट : राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तर मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. या मुसळधार पावसाचा शेतीपिकांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी शेती पिक उध्वस्त झाली. त्यात सलग तीनदा पुराचा फटका बसून शेतातील पीक उद्ध्वस्त झाल्याने नैराश्यातून एका शेतकऱ्याने आत्महत्या करत जीवन संपवले. शेतकरी नैराश्यात - स्वत:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोर बांधून गळफास लावून या शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना भंडारा जिल्ह्याती लाखांदूर तालुक्यातील किन्ही गुंजेपार येथे सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गोविंदराव महादेव दाणी, असे 67 वर्षीय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गोविंदराव दाणी यांच्याकडे किन्ही गुंजेपार शिवारात सहा एकर शेती आहे. खरीप हंगामात त्यांनी धानासह इतर पिकांची लागवड केली होती. मात्र, मागील जुलै व ऑगस्ट महिन्यांत तालुक्यातील पावसाने तब्बल तीनदा पूर परिस्थिती निर्माण झाली. यामुळे गोविंदराव यांच्या शेतातील पीक तीनदा पाण्याखाली आले आणि त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. शेतीसाठी त्यांना हजारो रुपयांचा खर्च करावा लागला होता. त्यात पीकही पाण्याखाली गेले. या संपूर्ण प्रकारामुळे ते तणावात होते. अखेर या तणावातच ते सोमवारी पहाटेच्या सुमारास घरातील सदस्य झोपेत असताना आपल्या शेतात निघून गेले. याठिकाणी त्यांनी आंब्याच्या झाडाला नायलॉन दोर बांधून गळफास घेतला आणि आपला जीवनप्रवास संपवला. हेही वाचा -  गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, सरपण गोळा करायला गेला अन्… दरम्यान, सकाळ झाल्यावर त्यांचा मुलगा शेतात गेला होता. यावेळी त्याला त्याचे वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले आणि यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून लाखांदूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या