JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / कोरोनाला रोखण्यासाठी तुकाराम मुंडेंचा धडाका, PPE किट घालून थेट रुग्णांशी साधला संवाद

कोरोनाला रोखण्यासाठी तुकाराम मुंडेंचा धडाका, PPE किट घालून थेट रुग्णांशी साधला संवाद

नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकतीच शासकीय मेडिकल रुग्णालयात व इंदिरा गांधी शासकीय कोविड रुग्णालयात भेट दिली.

0107

कोरोना थैमानाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकतीच शासकीय मेडिकल रुग्णालयात व इंदिरा गांधी शासकीय कोविड रुग्णालयात भेट दिली.

जाहिरात
0207

नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी 3000 चा आकडा पार केला आहे. नागपुरात काल आणखी 68 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर नागपूरच्या कामठी तालुक्यात पुन्हा 13 रुग्ण आले पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जाहिरात
0307

नागपुर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनात संघर्ष होत असल्याचंही चित्र आहे.

जाहिरात
0407

तुकाराम मुंढे हे आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जातात. कोरोना रुग्णांची भेट घेतल्यानंतरही तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला ताबोडतोब आदेश दिले.

जाहिरात
0507

तुकाराम मुंढे यांनी स्वतः PPE KIT घालून आयसोलेशन वार्डात जावून रुग्णांशी संवाद साधला. येथील परिस्थितीचा आढावा घेत संबंधितांना सूचना व दिशानिर्देश दिले.

जाहिरात
0607

यावेळी स्वतः तुकाराम मुंढे यांच्यासह डॉक्टर अविनाश गावंडे आणि डॉ.फैजल उपस्थित होते.

जाहिरात
0707

शहरात कोरोना संक्रमण वेग वाढत असताना आयुक्त तुकाराम मुंढे आक्रमक झाले आहेत. मुंढे यांनी शहरातील रस्त्यांवर उतरत कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली. तसंच गांधीबाग झोनमध्ये कोविडबाबतच्या दिशानिर्देशाचे पालन न करणारऱ्यांना समज दिल्याचं पाहायला मिळालं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या