प्रमोद पाटील, प्रतिनिधी पेण, 5 जानेवारी : पेणमध्ये एका मुस्लिम तरुणाने हनुमानाची अश्लील पोस्ट शेअर केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेनंतर या तरुणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उठाबशा काढायला लावल्या. कुणी एका व्यक्तीने हनुमान विषयी अश्लील पोस्ट केली होती. तीच पोस्ट या तरुणाने शेअर केली यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाऊन त्याला माफी मागायला लावली. तसेच यानंतर भविष्यात अशा प्रकारची पोस्ट करणार नाही, असेही या तरुणाला कबूल करायला लावले. सदर प्रकरण पोलीस ठाण्यात कळविले असून, पोलिसांनी तरुणाला चौकशीसाठी बोलावले आहे.
हेही वाचा - सप्तशृंगी गडावर शाकंभरी नवरात्रोत्सव, दर्शनासाठी भाविकांची गर्दी,Video राम मंदिर उद्घाटनाची तारीख ठरली, अमित शहांनी केली घोषणा - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली. त्रिपुरात एका सभेवेळी त्यांनी बोलताना म्हटलं की, अयोध्येत पुढच्या वर्षी १ जानेवारीला भव्य राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येईल. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. अमित शहा म्हणाले की, मी २०१९ मध्ये भाजपचा अध्यक्ष होतो तेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळी राहुल बाबा दररोज विचारायचे की मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. राहुल गांधी आज कान उघडून ऐका. एक जानेवारी २०२४ ला अयोध्येतील राम मंदिर बांधकाम पूर्ण होऊन तयार असेल.