JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : हॉलिवूड थक्क होईल असे स्टंट करणारा मराठी तरूण, सैन्यालाही करतो मदत

Video : हॉलिवूड थक्क होईल असे स्टंट करणारा मराठी तरूण, सैन्यालाही करतो मदत

एका इमारतींवरून दुसऱ्या इमारतीवर उड्या मारण्याचे प्रकार हे एका साहसी खेळाचा भाग आहे. मुंबईतील एक तरुण यामध्ये हॉलिवूडलाही लाजवेल असे स्टंट करतो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 नोव्हेंबर : एका इमारतींवरून दुसऱ्या इमारतीवर उड्या मारण्याचे प्रकार तुम्ही हे बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या सिनेमात पाहिले असतील. स्पाडरमॅन सारखे हे स्टंट हे खेळाचा भाग आहे. एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर लांब उडी मारण्याचे हे प्रकार पार्कोर या खेळात येतात. अत्यंत साहसी असा हा खेळ मुंबई मध्ये लोकप्रिय व्हावा यासाठी दीपक माळी हा मराठी तरूण प्रयत्न करतोय. विशेष म्हणजे त्याचे यामधील कौशल्य पाहून लष्करानंही त्याला विशेष सत्र घेण्यासाठी बोलावलं आहे. दीपक मूळचा सांगलीचा. लहान असताना डोंगरदऱ्यांमध्ये तो हिंडत असे. एके दिवशी मोबाईल मध्ये पार्कोरचा व्हिडिओ बघताना त्याला सुचलं की आपणही हे करू शकतो आणि मग त्याची पार्कोर खेळायला सुरुवात झाली. भारतीय सैन्याकडून आमंत्रण पार्कोर खेळामधील अनेक स्टेप्स  सैन्यात वापरल्या जातात आणि महत्वाच्या असतात. त्यामुळे भारतीय सैन्य दलाकडून एन एस जी जवानांना या खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी दीपकला आमंत्रित करण्यात येते.

अनेक चित्रपटांमध्ये सहभाग पार्कोर खेळताना अनेक भयानक स्टंट असतात या स्टंट्सचा वापर अ‍ॅक्शन चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे हे सर्व करत असताना अभिनेत्याला एक गाईड हवा असतो त्यासाठी सुद्धा दीपकला आमंत्रित करण्यात येतं. नुकतचं रामोजी फिल्म सिटी येथे एका चित्रपटाच्या शूटिंग साठी तो गेला होता. तसंच तो स्वतः सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये स्टंट करतो. पोलीस नसूनही गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे नितीन यादव, पाहा कसे ठरले कर्दनकाळ, VIDEO अखंड असावे सावधान! पार्कोर हा खेळ जीवघेणा सुद्धा समजला जातो, पण आपण सावध असलो तर काही अनर्थ घडत नाही.  काही दिवसांपूर्वी वरळीमध्ये परदेशी प्रोफेशनल पार्कोर काही स्टंट करत होते.  त्याचा नकारात्मक प्रचार करण्यात आला होता. या खेळाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे पण सगळ्या गोष्टी शिकल्या तर सहज शक्य होतात, असं दीपक सांगतो. 40 व्या माजल्यावर क्रेन ला एका हाताने लटकून इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दीपकची नोंद झाली आहे. तसंच आजपर्यंत अनेकदा उंचावरून उड्या मारत त्याने इमारती सर केल्या आहेत. Video: लॉकडाऊनमध्ये दिसला दगड आणि बदललं आयुष्य, मुंबईकर तरूण झाला देशभर फेमस पार्कोर कसा खेळला जातो? ‘लहान मुलांना उद्यानात नेल्यावर ते तेथील खेळण्यासोबत खेळतात तेच मुळात पार्कोर असतं त्याच गोष्टी थोड्या अ‍ॅडव्हान्स पद्धतीने शिकवण्यात येतात. आम्ही पुणे आणि मुंबईत या खेळाच्या प्रशिक्षणाची अकादमी सुद्धा चालवतो. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकवतो, अशी माहिती दीपक यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या