मुंबई : दहीहंडीमुळे शुक्रवार शनिवार आणि रविवार असा लाँग विकेण्ड आला आहे. त्यामुळे बरेच जण बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असतील किंवा बॅग पॅक करून निघालेही असतील. तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सलग सुट्ट्यांमुळे तुम्हाला वाहतूक कोंडीचा (Traffic alert) सामना करावा लागू शकतो. सलग सुट्ट्यांमुळे अनेकजण फिरायला बाहेर पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आज अनेक ठिकाणी दहीहंडी असल्याने बऱ्याच ठिकाणी वाहतूक वळवण्यात देखील आली आहे. त्यामुळे याचा फटका पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही घराबाहेर पडण्याआधी ज्या मार्गानं जाणार आहात तिथे नेमकी काय परिस्थिती आहे ते तपासून पाहा. शक्य असेल तर पर्यायी मार्गाची निवड करणं उत्तम त्यामुळे तुमचे प्लॅन यशस्वी होऊ शकतात. तुम्ही ट्रॅफिकमध्ये (Traffic alert) अडकणार नाही. त्यामुळे ट्रॅफिक अलर्ट पाहूनच घराबाहेर पडणं सोयीचं होईल.
मुंबई-नाशिक महामार्ग, शिळफाटा, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, काटईनाका ते शिळफाटा, शिळफाटा ते तळोजा-पनवेलमार्ग पूर्व द्रुतगती महामार्ग, जुना आग्रा रोड, मुलुंड – ऐरोली मार्ग या मार्गावर गुरुवारी वाहतूक कोंडी झाली होती. लाँग विकेण्डमुळे आजही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मुंबईहून पुणे आणि त्या मार्गाने जाणाऱ्यांनी देखील ट्रॅफिकचा अंदाज घेऊन बाहेर पडायला हवं. लाँग विकेण्ड, तोंडावर असलेला गणपती यामुळे मुंबई पुणे मार्गावरही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तुम्ही जर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर अलर्ट पाहूनच बाहेर पडा.