JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जवानांना कडक सॅल्युट! जीव धोक्यात घालून 170 विद्यार्थ्यांची केली सुटका, पाहा PHOTO

जवानांना कडक सॅल्युट! जीव धोक्यात घालून 170 विद्यार्थ्यांची केली सुटका, पाहा PHOTO

धुवाँधार पावसानं रफीका शाळेत शिरलं पाणी, 170 विद्यार्थ्यांची अशी केली सुटका, पाहा PHOTO

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे : मुंबई, ठाण्यासोबत उपनगरात झालेल्या मुसळधार पावसाने चांगलीच तारांबळ उडाली. मुंबई-ठाण्यासह उपनगरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. चार तास झालेल्या पावसानं मुंबईची तुंबई झाली तर अनेक ठिकाणी वाहतूकही ठप्प झाली होती. याचा फटका शाळेतील विद्यार्थ्यांनाही बसला आहे. आई-वडिलांनाही मुलं घरी कशी परतणार याची चिंता होती. मुसळधार पावसाने रफीका हायस्कूलमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे विद्यार्थी शाळेतच अडकले. घरी कसं जायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली. संध्याकाळी 6च्या सुमारास माहिती मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापाचे अधिकारी तातडीने तिथे पोहोचले. म्हापे रोड, शिळफाटा, दिवा येथे फाउंटन हॉटेल जवळ मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे रफीका हायस्कूल या शाळेमध्ये पाणी शिरलं होतं.

त्यामुळे शाळेतील विद्यार्थी अडकले होते. अग्निशमन दलाचे जवान १ फायर वाहनासह विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्यासाठी पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रेस्क्यू केलं. शाळेमध्ये अडकलेल्या १७० मुलांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. मुंबई-ठाण्यासह गुरुवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास पावसाने जोर धरला होता. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी सजलं होतं. लोकल सेवाही विस्कळीत झाली होती. या पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडवली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या