JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING NEWS: शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या

BREAKING NEWS: शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या

Shivsena mla mangesh kudalkar Wife Suicide: मंगेश यांच्या पत्नी रजनी यांच्या आत्महत्येची बातमी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 एप्रिल : शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या पत्नी रजनी मंगेश कुडाळकर (Rajni Kudalkar) यांनी आज गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. रजनी यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. मंगेश कुडाळकर हे कुर्ला (Kurla) विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मंगेश यांच्या पत्नी रजनी यांच्या आत्महत्येची बातमी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या नेमकी का केली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने मतदारसंघातील नागरीकांना धक्का बसला आहे. रजनी यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असल्याची चर्चा सुरु आहे. पण त्याबाबतची अधिकृत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. कुर्ल्याच्या नेहरु नगर परिसरात कुडाळकर कुटुंब वास्तव्यास आहे. नेहरु नगरमधील राहत्या घरीच रजनी यांनी आत्महत्या केली. रजनी यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस कुडाळकर यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना रजनी यांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. रजनी यांनी आत्महत्या का केली? याबाबतची अद्याप अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

संबंधित बातम्या

रजनी यांच्या मुलाचं काही महिन्यांपूर्वी अपघाती निधन झालं होतं. त्यामुळे त्या खचल्या होत्या, अशीदेखील माहिती समोर येत आहे. दरम्यान, रजनी कुडाळकर यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आमदार मंगेश कुडाळकर यांच्याशी संपर्क करून त्यांचे सांत्वन केलं. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी घटनेची माहीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या