JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबई-ठाण्यातील पावसाचं रौद्र रूप दाखवणारे 3 भयंकर Video

मुंबई-ठाण्यातील पावसाचं रौद्र रूप दाखवणारे 3 भयंकर Video

काही तासांत इतका पाऊस झाला की, मुंबई-ठाण्यातील रस्त्यांची स्थितीच बदलली

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 सप्टेंबर : गेल्या दोन तासांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. काही तासांत इतका पाऊस झाला की, मुंबई-ठाण्यातील रस्त्यांची स्थितीच बदलली. ठिकठिकाणी पाणी जमा झालं आहे. रूळावर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुढील काही तास मुंबई आणि उपनगरात तुफान पाऊस कोसळणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली कल्याण येथे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे.  कल्याण रेल्वे स्थानकाजवळही पाणी जमा झाले आहेत. मुसळधार पावसामुळे ठाण्यापासून पुढे रेल्वे वाहतूक खोळंबली आहे.

सुरुवातीला नाहूर ते विक्रोळी दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर वाहतूक धिम्या गतीने सुरु झाल्याची माहिती समोर आली होती.

संबंधित बातम्या

ही माहिती ताजी असतानाच आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर प्रचंड मोठा परिणाम झाला आहे. ठाण्यापासून पुढे कळवा ते कल्याणपर्यंत वाहतूक खोळंबली आहे.

जाहिरात

महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उद्यापासून मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिममध्य व लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर ओडिशा, महाराष्ट्र व दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील 5 दिवसांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या