JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai : ओव्हरलोडमुळे अंधेरी स्टेशनवरील लिफ्ट अडकली; 18 प्रवाशांचे जीव होते धोक्यात

Mumbai : ओव्हरलोडमुळे अंधेरी स्टेशनवरील लिफ्ट अडकली; 18 प्रवाशांचे जीव होते धोक्यात

यादरम्यान 1 महिला बेशुद्ध झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑगस्ट : ऐन गर्दीच्या वेळी अंधेरी रेल्वे स्टेशनवरील लिफ्ट बंद पडल्याची घटना समोर आली आहे. ओव्हरलोड झाल्याने लिफ्ट बंद पडल्याचं सांगितलं जात आहे. या लिफ्टमध्ये तब्बल 18 प्रवासी होते. लिफ्ट पडल्यानंतर तातडीने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अंधेरी रेल्वे स्टेशनवर लिस्टमध्ये 18 लोक अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. यातील एक महिला बेशुद्ध झाली होती. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस आणि इतरांच्या मदतीने प्रवाशांना लिफ्टमधून लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. यातील एक महिला बेशुद्ध झाली. त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. इतर सुखरूप असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. महिलेचीही प्रकृती स्थिर आहे. प्रवाशांच्या आंदोलनानंतर मध्य रेल्वे बॅकफूटवर! AC Local बद्दल घेतला महत्त्वाचा निर्णय संध्याकाळी ७ च्या सुमारास अंधेरी रेल्वे स्थानकात लिफ्ट ओव्हरलोड झाल्याने अचानक बंद पडली होती. यामुळे तब्बल 18 प्रवाशी लिफ्टमध्ये अडकले होते. 18 प्रवासी एकाच वेळी लिफ्टमध्ये गेल्यामुळे लिफ्ट ओव्हरलोड झाली आणि मध्येच थांबली. मात्र यानंतर तत्काळ रेल्वे कर्मचारी यांनी लिफ्टची पाहणी करून लिफ्ट सुरु केली आणि अडकलेले १८ जणांना लिफ्टमधून बाहेर काढण्यात आलं. साधारण १० ते १५ मिनिटं हा सर्व प्रकार सुरू असल्याने रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या