JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'लालबागच्या राजा'च्या चरणी भक्तांचं 5 दिवसात कोट्यवधीचं दान! 250 तोळे सोनं, 2900 तोळे चांदी अन्..

'लालबागच्या राजा'च्या चरणी भक्तांचं 5 दिवसात कोट्यवधीचं दान! 250 तोळे सोनं, 2900 तोळे चांदी अन्..

दोन वर्षाच्या खंडानंतर मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनला भक्तांची रिघ. पाच दिवसांत लाखो गणेशभक्तांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 सप्टेंबर : सध्या राज्यभरात गणेशोत्सवाची धूम आहे. त्यातही पुणे-मुंबईत देशासह जगभरातून गणेशभक्त दर्शनासाठी येत असतात. मुंबईतील (Mumbai) ‘लालबागच्या राजा’च्या  (Lalbaugcha Raja) दर्शनाला देशभरातून भक्तांची रांग लागते. याची प्रचिती आपल्याला लालबागच्या राजाच्या चरणी आलेल्या दानातून येऊ शकते. पहिल्या पाच दिवसात ‘लालबागचा राजा’च्या चरणी भक्तांनी अडीच कोटींचे दान जमा केलं आहे. राजाच्या दानपेटीत सोन्या-चादींची खैरात गेली दोन वर्ष कोरोनामुळे भक्तांना लालबागच्या राजाचं दर्शन झालं नव्हतं. त्यामुळेही गणेशभक्तींची संख्या यावर्षी जास्त आहे. पाच दिवसांत लाखो गणेशभक्तांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. अजूनही लालबाग राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी आहे. पाच दिवसात अडीच कोटी रुपये इतकं दान लालबागच्या राजाच्या दानपेटीत जमा झालंय. यामध्ये रोख रकमेसह नाण्यांचाही समावेश आहे. तसेच मोठ्या प्रमाणात सोने-चांदी देखील भक्तांनी अर्पण केली आहे. जवळपास 250 तोळे सोनं आणि 2900 तोळे चांदीचं दान लालबागच्या राजाच्या दानपेटीत अर्पण करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या

राज्याच्या चरणी भक्तांचं मोकळ्या हाताने दान दरवर्षी लालबागचा राजाला किती देणगी जमा होते, याची माहिती मंडळाच्या वतीने दिली जाते. राजाच्या दानपेटीत किती देणगी जमा होते, याची आकडेवारी जाणून घेण्यासाठी लोकांमध्येही कुतूहल पाहायला मिळतं. घरातील गणपतींचे विसर्जन झाल्याने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी  गर्दी वाढली आहे. सोने, चांदी, रोख रक्कम याशिवाय दानपेटीत चिठ्ठ्या टाकून भाविकांनी लालबागच्या राजाला आपल्या मनातल्या भावनाही कळवल्या जातात. मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दानपेटीत गणेशभक्तांकडून जितकं सढळ हातानं दान करण्यात येतं, तितक्याच सहजतेनं काही भक्त आपलं मनही देवाकडे मोकळं करत असतात. राज्यात चरणी सामान्यांसह सेलिब्रिटीही मोठ्या संख्येने येत असतात. वाचा - पुण्यातली विसर्जन मिरवणूक परंपरेनुसारच होणार, पण.. हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या