मुंबई : तुम्ही घराबाहेर पडण्याआधी वेळेचं नियोजन करणं आवश्यक आहे. सुट्टीच्या दिवशी बाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. मध्य-हार्बर मार्गावर तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचं शेड्युल रेल्वेकडून जाहीर करण्यात आलं आहे. पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक असणार नाही. त्यामुळे या दोन्ही मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेवर धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली आहे. विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स अप आणि डाऊन दोन्ही धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी ते विद्याविहार १०.५५ ते ३.५५ या वेळेत ब्लॉक असणार आहे. तर विद्याविहार ते सीएसएमटी मार्गावर १०.५५ ते ३.५५ या वेळेत ब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार आहे. अप आणि डाऊन मार्गावर ११.१० ते ४.१० पर्यंत ब्लॉक असेल. कुर्लाहून शेवटची लोकल १०.१८ मिनिटांनी सुटेल तर वाशीहून शेवटची लोकल १०.५ मिनिटांनी सुटणार आहे. दोन्हीकडील सेवा संध्याकाळी ४.२२ मिनिटांनी पूर्ववत होण्याची शक्यता आहे. कुर्ला ते सीएसएमटी आणि पनवेल ते वाशी ब्लॉक कालावधीमध्ये विशेष ट्रेन चालवण्यात येतील. हार्बर मार्गाने प्रवास करणाऱ्यांना १० ते ६ या वेळेत ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.