JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबईच्या समुद्राखालून ताशी 300 किमी वेगाने धावणार बुलेट ट्रेन! वाचा काय आहेत वैशिष्ट्य

मुंबईच्या समुद्राखालून ताशी 300 किमी वेगाने धावणार बुलेट ट्रेन! वाचा काय आहेत वैशिष्ट्य

अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवर महाराष्ट्रात 21 किलोमीटर्स लांबीचा बोगदा बांधला जाणार आहे. यापैकी सात किलोमीटर्सचा बोगदा समुद्राखाली असेल.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 सप्टेंबर :   मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन  प्रकल्पाचं काम वेगाने सुरू आहे. या मार्गावर समुद्राखाली 7 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यासाठी टेंडर्स मागवण्यात आली आहेत. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवर  महाराष्ट्रात 21 किलोमीटर्स लांबीचा बोगदा बांधला जाणार आहे. यापैकी सात किलोमीटर्सचा बोगदा समुद्राखाली असेल. अशा प्रकारचा समुद्राखालून जाणारा बोगदा देशात पहिल्यांदाच बांधला जात आहे. या संदर्भातलं वृत्त ‘झी बिझनेस’ने दिलं आहे. समुद्राखालच्या बोगद्यात बुलेट ट्रेनचा वेग ताशी 300 किमी असेल. ‘झी’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात  एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या कामाला वेग आला आहे. यासाठी यापूर्वी मागविण्यात आलेल्या निविदा रद्द करून नव्याने निविदा मागविण्यात येत आहेत. बुलेट ट्रेनसाठी बांधण्यात येत असलेल्या या प्रोजेक्टचं मुख्य आकर्षण मानला जाणारा हा बोगदा  वांद्रे कॉम्प्लेक्स ते शिळफाटा इथल्या भूमिगत स्थानकादरम्यान बांधण्यात येणार आहे. टेंडर डॉक्युमेंटमधल्या माहितीनुसार, हा बोगदा टनेल बोरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) वापरून बांधण्यात येणार आहे. एकाच बोगद्यात येण्यासाठी आणि जाण्यासाठी ट्रॅक बनवण्यात येणार आहे. पॅकेजचा एक भाग म्हणून, बोगद्याभोवती 37 ठिकाणी 39 उपकरण कक्ष बांधले जाणार आहेत. या बोगद्याच्या बांधकामासाठी 13.1 मीटर व्यासाचे कटर हेड असलेले टीबीएम वापरले जातील. एमआरटीएस-मेट्रो प्रणालीमध्ये वापरल्या जाणार्‍या शहरी बोगद्यांसाठी साधारणपणे 5-6 मीटर व्यासाचं कटर हेड वापरलं जातं. मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता शहरात प्रवास करणं महागणार सुमारे 16 किलोमीटर्सचा बोगदा बांधण्यासाठी तीन बोअरिंग मशीन्स वापरली जातील आणि उर्वरित 5 किलोमीटर्सचा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने बांधला जाईल. हा बोगदा जमिनीपासून सुमारे 25 ते 65 मीटर खोल असेल आणि सर्वांत खोल बांधकाम बिंदू शिळफाटाजवळच्या पारसिक टेकडीच्या खाली 114 मीटरवर असेल. विशेष म्हणजे बुलेट ट्रेनसाठी बांधण्यात येणारा ठाणे खाडीतला हा सात किलोमीटर लांबीचा बोगदा समुद्राखाली बांधला जाणारा देशातला पहिलाच असेल, असा दावा केला जात आहे. निविदेतल्या माहितीनुसार, या बोगद्याचं काम 1888 दिवसांत पूर्ण करावं लागणार असून, या बोगद्यात ताशी 300 किमी वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. धक्कादायक! मुंबईत शालेय विद्यार्थ्यांना ड्रग विकल्याचा प्रकार गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये NHSRCL ने या प्रकल्पासाठी भूमिगत बोगद्याच्या कामासाठी टेंडर्स मागवली होती; मात्र यंदा अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कारणांमुळे ती रद्द केली होती. NHSRCL ने 2019 मध्ये या प्रकल्पासाठी पहिल्यांदा टेंडर्स मागवली होती. परंतु एकाही बिडरने यात रस दाखवला नव्हता. नंतर, बुलेट ट्रेनशी संबंधित या प्रकल्पासाठी नोव्हेंबर 2021 मध्ये पुन्हा टेंडर्स मागवण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या