MNS worker slap women in mumbadevi mumbai
मुंबई : मनसे पदाधिकाऱ्याची दादागिरी पाहायला मिळाली. गणेश चतुर्थीदरम्यान त्याने एका महिलेला बेदम मारहाण केली आहे. ही धक्कादायक घटना मुंबाईदेवी परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे.मुंबादेवी परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. मनसे पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केल्याचं दिसत आहे. मारहाण करणारा व्यक्ती मनसेचा उपविभाग प्रमुख असून त्याचं नाव विनोद अरगिले असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नेमकं काय घडलं मनसेची कार्यकर्ते आणि उपविभाग प्रमुख गणेश चतुर्थीसाठी होर्डिंग लावयला आले. त्यासाठी त्यांना खांब उभे करायचे होते. मेडिकलसमोर खांब उभे करण्यासाठी महिलेनं विरोध केला. या दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
बाचाबाचीचं रुपांतर पुढे हात उचलण्यापर्यंत गेलं आणि मनसे उपविभाग प्रमुखाचा संयम सुटला. त्याने महिलेला बेदम मारहाण केली. आजूबाजूच्या लोकांनी महिलेला वाचवण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली. या वादात कोणीच मध्यस्ती देखील केली नाही असा आरोप महिलेनं केला आहे. महिलेनं विनोद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दादागिरी करून शिवीगाळ केली. याशिवाय हात उगारला आणि बेदम मारहाण केल्याचंही या महिलेनं पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणी राज ठाकरे आता या पदाधिकाऱ्यावर काय कारवाई करणार हे देखील पाहावं लागणार आहे.