मुंबई, 14 ऑक्टोंबर : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या आपल्या शैलीतून विरोधकांना चांगलाच घाम फोडत असतात. सोमय्यांनी काढलेल्या घोटाळ्यांची चौकशी होत असल्याने कित्येक नेत्यांवर अटकेची टांगती तलवार आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांच्या आधारावर अटकेत आहेत. दरम्यान सध्या चर्चा सुरू आहे ती किरीट सोमय्यांच्या मुलाची म्हणजे निल सोमय्यांनी अवघ्या 14 महिन्यात पीएचडीची पदवी घेतल्याने त्यांच्या एवढ्या कमी कालावधीत घेतलेल्या पदवीची जोरदार चर्चा सुरू आहे.
महाविकास आघाडी सरकार काळात किरीट सोमय्यांनी जवळपास 18 नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप केले होते. यामुळे किरीट सोमय्या आता नवीन कोणता घोटाळा बाहेर काढणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून असायचे. दरम्यान किरीट सोमय्यांचा मुलगा निल यांच्या पीएचडी पदवी बाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा : ऋतुजा लटकेंना उमेदवारी, ‘महाविकासआघाडी’चं शक्तीप्रदर्शन, 7 नेते मैदानात!
सोशल मीडियातील व्हायरल दाव्यानुसार, किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी अवघ्या 14 महिन्यांत पदवी मिळवल्याचे बोलले जात आहे. अवघ्या 14 महिन्यांत निल सोमय्यांनी पीचडीकशी पूर्ण केली यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असल्याने निल सोमय्यांची पीचडी वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या कागदपत्रांनुसार, निल सोमय्यांनी ऑगस्ट 2021 मध्ये आपला प्रबंद सादर केला होता. त्यानंतर दीड महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये तोंडी परीक्षा त्यानी दिली होती. विशेष म्हणजे या तोंडी परीक्षेच्या दुसऱ्याचं दिवशी पीएचडी पदवी मुंबई विद्यापीठाकडून प्रदान करण्यात आली.
याबाबतचे निल सोमय्यांनी आपल्या सोशल खात्यावरून पदवी मिळाल्याचे फोटो शेअर केले आहेत. यावर नेटकऱ्यांनी उलटा सवाल केला. 14 महिन्यात कशी काय पीएचडीची पदवी मिळते यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
किरीट सोमय्यांकडून आरोपांचे खंडण
दरम्यान किरीट सोमय्यांनी यावर आक्षेप घेत सध्या सोशल मिडीयावर सुरू आहे ते चुकीचे असल्याचे सांगितले. निल सोमय्यांनी 17 सप्टेंबर 2016 ला परीक्षा दिल्याचे सांगितलं. दुसरा कागद नील सोमय्यांच्या पीएचडीच्या पूर्ण कार्यक्रमाचा आहे. यात पीएचडी रजीस्ट्रेशनची तारीख जून 2021 ची आहे. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाकडे तक्रारही करण्यात आली आहे. हे सर्व काही नियमांमध्ये होत असल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.
हे ही वाचा : अंधेरीचा पेच सुटला, मुरजी पटेलांचा पक्षही ठरला! शुक्रवारी अर्ज भरणार
परंतु विरोधकांनी मात्र सोमय्याच्या मुलाच्या पीएचडीवरून रान उठवण्यासा सुरूवात केली आहे. 14 महिन्यांचा आरोप खोडून काढत पीएचडी करण्यासाठी निल सोमय्यांना 72 महिने लागल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.