JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Breaking : भाजप नेते मोहीत कंबोज यांच्या गाडीवर मातोश्रीजवळ हल्ला; Exclusive Video

Breaking : भाजप नेते मोहीत कंबोज यांच्या गाडीवर मातोश्रीजवळ हल्ला; Exclusive Video

मोहित कंबोज ‘मातोश्री’ जवळ रेकी करत असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 एप्रिल : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्या मातोश्रीवर हनुमान चालीसाचं पठण करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर मातोश्रीजवळ शिवसेना कार्यकर्ते ठाण मांडून बसले आहेत, जर नवनीत राणा यांनी हनुमान चालीसाचं पठण केलं तर त्यांना शिवसेनेकडून महाप्रसाद देण्यात येणार असल्याचा शिवसेना नेत्यांनी इशारा दिला आहे. दरम्यान आज भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. मातोश्रीजवळी कलानगर सिग्नलजवळ हा हल्ला करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

मोहित कंबोज ‘मातोश्री’ जवळ रेकी करत असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. या रागातून शिवसेना कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या