03 सप्टेंबर : दिवा आणि मुंब्रा दरम्यान रेल्वे रूळाला तडे गेल्याने सलग दुसर्या दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. अप स्लो ट्रॅकवरील वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली असून वाहतूक 25 मिनिटं उशिराने चालत आहेत. दिवा ते मुंब्रा या स्टेशनदरम्यान रूळांना तडे गेल्यामुळे बुधवारी सलग दुसर्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. तडा गेलेल्या रूळांचे दुरूस्तीचे सुरू असल्यामुळे सध्या मध्य रेल्वेच्या सीएसटीकडे जाणारी सर्व वाहतूक फस्ट ट्रॅकवर वळवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आजसुद्धा रेल्वे स्टेशनवर ताटकळत उभे रहावे लागणार आहे. कालच मंगळवारी मध्य रेल्वेच्या घाटकोपर-विक्रोळी या स्थानकांदरम्यान सकाळी ओव्हरहेड वायर तुटून छोटा स्फोट झाला होता. त्यामुळे प्रवाशांना आतोनात हाल होत आहेत. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++