MSc TI
मुंबई, 21 जून : रोजगार निर्मितीमध्ये माहिती तंत्रज्ञानाची भूमिका ही सर्वाधिक राहिलेली आहे. आयटी क्षेत्रात प्रामुख्याने सर्वाधिक रोजगार उपलब्ध होत आहेत. भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांचं भविष्य हे उज्ज्वल असणार आहे. यासाठीच विविध विद्यापिठात अनेक कोर्सेस हे सूरु केले आहेत. मुंबई विद्यापीठातदेखील एमएससी आयटची हा कोर्स (MSc TI course) सुरू करण्यात आलेला आहे. या कोर्सच महत्त्व लक्षात घेऊन 2020 मध्ये या कोर्सेसमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. आता यामध्ये अनेक नवे अभ्यासक्रम शिकवले जाणार असून विद्यार्थ्याना पुढील आयुष्यात याचा नक्कीच फायदा होणार आहे. (MSc TI course started at Mumbai University) MSc IT कोर्समध्ये कसा घ्याल प्रवेश? BSc पदवीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तसेच बीएससी आयटी, बीएससी कम्प्युटर सायन्स, बीएससी मॅथेमॅटिक्स, बीएससी स्टॅटिस्टिक, बीएस्सी फिजिक्स BE, या विद्यार्थ्यांनादेखील मेरिटनुसार प्रवेश मिळणार आहे. वाचा :
Aurangabad : बारावी नुकतीच झालीय? तर फक्त ‘हा’ कोर्स करा अन् सुरूवातीचा पगारच 30,000 मिळवा
या कोर्सचं स्वरूप काय? हा कोर्समध्ये 4 ट्रॅक आहेत्. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाऊंड कम्प्युटिंग, सेक्युरिटी, इमेज प्रोसेसिंग असे 4 ट्रॅक आहेत. प्रत्येक ट्रॅकचे 3 विषय असून प्रामुख्याने 12 विषय आहेत. एक विषय कम्पल्सरी असणार आहे. एकूण 4 सेमीस्टर असणार आहेत. 2 वर्षांचा कोर्स असणार आहे. एकूण 16 पेपर असणार आहेत. किती विद्यार्थी संख्या किती आणि फी किती? मुंबई विद्यापिठात या कोर्ससाठी 34,000 रुपये इतके आहे. बाहेर खासगी इन्स्टिट्यूटमध्ये हा कोर्स करायला जाल, तर त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. परंतु, मुंबई विद्यापीठात हा कोर्स तुलनेने कमी पैशांमध्ये उपलब्ध झालेला आहे. या कोर्ससाठी विद्यार्थ्यांची संख्या 100 करण्यात आलेली आहे. तसेच सरकारी नियमांनुसार विद्यार्थ्यांनाही आरक्षण दिले जाणार आहे. वाचा :
Pune : 3 शाखांचा अभ्यास तोही एकाच कोर्समध्ये, मग तर जाॅबच्या संधीच संधी! ‘हा’ आहे MIT चा नवा कोर्स
हा कोर्स विद्यार्थ्यांसाठी का फायदाचा आहे? मुंबई विद्यापीठात या कोर्सला प्रवेश घेतला की, आधुनिक ग्रंथालय, प्रतिभावंत प्राध्यापक, आधुनिक लॅब, लॉकर, सेमिनार, विद्यापीठाच्या सोयीनुसार हॉस्टेल इत्यादी सोयी पुरवल्या जातात. विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक फायदे पुरवले जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा पाया पक्का व्हावा, यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
गुगल मॅपवरून साभार…
नोकरीच्या संधी कुठे आणि प्लेसमेंट कशा होतात? हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी चार आकडी पगाराच्या नोकऱ्या नक्कीच मिळणार आहेत. यामध्ये खाजगी क्षेत्र, सरकारी क्षेत्र, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोग्रामिंग टेक्निकल पोस्ट, संशोधनासाठी संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. हा कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयटी कंपनी, विप्रो इन्फोसिस, टीसीएसआय गेट या मोठ्या कंपन्या विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी येतात. या कोर्ससाठी विद्यार्थी udit.mu.ac.in वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा office@udit.mu.ac.in या ई-मेलदेखील करू शकतात. विद्यापीठ माहिती तंत्रज्ञान विभाग, मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस, डॉ. शंकरदयाळ शर्मा भवन येथे 3 रा मजला, खोली क्रमांक 305, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई-400 098 या पत्त्यावर संपर्क साधू शकतात.